व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेचे शासकीय चित्रकला परीक्षेत सुयश.
आजरा. – प्रतिनिधी.
व्यंकटराव हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला परीक्षा २०२१ या परीक्षेत उज्ज्वल सुयश संपादन केले. शासनाच्या ( शिक्षण विभागाच्या) सुधारित नियमानुसार इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या एकूण गुणांमध्ये चित्रकला या विषयाचे गुण वाढीव गुण म्हणून धरतात त्यामुळे प्रतिवर्षी या विषयाकडे विद्यार्थी ,पालक व शिक्षक यांचा चित्रकला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मार्गातील एक चांगली संधी मानली जाते. म्हणून प्रतिवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ठ होतात. आमच्या प्रशालेतील एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेसाठी एकूण ६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कु. नाईक संचीता सुभाष हिने या परीक्षेत ‘A’श्रेणी मिळविली. *तसेच २२ विद्यार्थी ‘B’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली. इंटरमिजिएट परीक्षेसाठी इयत्ता १० वी चे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये ७० विद्यार्थी परीक्षेला बसली. पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २२ विद्यार्थ्यांना ‘B’श्रेणी प्राप्त झाली. व्यंकटराव हायस्कूल केंद्र क्रमांक ११०००१. या केंद्रावर एकूण दहा शाळेतील इलेमेंटरीसाठी २४५ विद्यार्थी बसले पैकी २३७ उत्तीर्ण झाले एक विद्यार्थी ‘A’श्रेणीमध्ये आला. ‘B’श्रेणीत ३३ विद्यार्थी आले. निकाल..९७.४६%
व इंटरमिजिएटसाठी २४१ विद्यार्थी बसले पैकी २२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले..B श्रेणीत ६७ विद्यार्थी आले.
निकाल…९८.६७% व्यंकटराव प्रशालेच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , संचालक मंडळ, प्राचार्य एस.बी. गुरव, पर्यवेक्षक एस. जी.खोराटे यांचे प्रोत्साहन लाभले.. व कलाशिक्षक .कृष्णा दावणे यांचे मार्गदर्शन मिळाले.
