अखिल भारतीय मराठा महासंघ महिलाआघाडी नूतन अध्यक्षपदी. – मिलन इंजल यांची निवड.
आजरा. – प्रतिनिधी.
अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच्या आजरा तालुका अध्यक्षपदी मिलन इंजन यांची निवड करण्यात आली. आजरा तालुका मराठामहासंघ वतीने बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी मराठा महासंघाचा ध्येय -ध्यास व उद्देश तसेच सामाजिक अंधश्रद्धा व चुकीच्या रूढी-परंपरा व विधवा महिलावरील रुढी कशा कमी होतील याबाबतचे मार्गदर्शन श्री मोरे यांनी केले. महिला आघाडी माजी तालुकाध्यक्ष रचना होलम पुढील वर्षा करीता तालुका अध्यक्ष म्हणून सौ इंजल यांचे नाव सुचवले. धनश्री देसाई यांनी अनुमोदन दिले. महिला आघाडी व इतर सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सौ इंजल निवडपत्र देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सौ इंजल यांनी यापूर्वी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून माझी आज आपण तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले.
यावेळी शिवाजी पाटील, चंदू पारपोलकर, गणपतराव डोंगरे, संभाजी इंजल, शिवाजी गुडुळकर, महादेव पोवार, दत्तात्रय मोहिते सह तालुका कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक बंडोपंत चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन श्री इंजल यांनी केले आभार प्रकाश देसाई यांनी मानले.

