Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआज होणार संवेदना फाउंडेशन आजरा संवेदना कमल पुरस्कार वितरण सोहळा.

आज होणार संवेदना फाउंडेशन आजरा संवेदना कमल पुरस्कार वितरण सोहळा.

आज होणार संवेदना फाउंडेशन आजरा संवेदना कमल पुरस्कार वितरण सोहळा.

आजरा. – प्रतिनिधी.

संवेदना फाउंडेशन आजरा आयोजित संवेदना कमल पुरस्कार वितरण सोहळा २०२२ हत्तीवडे तालुका आजरा येथील न्यूज जय बजरंग व्यायाम शाळा पटांगणात स. १० वा. आयोजित केलेला असून संवेदना फाउंडेशन समाजपरिवर्तन चळवळीची पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने तालुक्यातील कला, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, कृषी, व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा कै. कमळाबाई पन्हाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संवेदना कमल पुरस्काराने सन्मान करत हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पन्हाळकर निवृत्त मुख्य प्रशासकीय अधीक्षक हिंदुस्तान पेट्रोलियम भारत सरकार तर कॉ.संपतराव देसाई सामाजिक कार्यकर्ते श्रमिक मुक्ती दल यांच्या यांच्या शुभहस्ते या वितरण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती राजकुमार सावंत डॉ. जॉन डिसूजा, सिद्धार्थ देसाई, अध्यक्ष संविधान फाउंडेशन अण्णाप्पा पाटील, शशिकला सुतार, पांडुरंग पाटील असून आजरा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आजरा तालुक्यातील तमाम नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संवेदना फाउंडेशन संवेदना पुरस्कार वितरण सोहळा कमिटीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.