Homeकोंकण - ठाणेदोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही.- मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल तर 3 शिक्षकांचे निलंबन.

दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही.- मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल तर 3 शिक्षकांचे निलंबन.

दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही.- मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल तर 3 शिक्षकांचे निलंबन

पुणे :- प्रतिनिधी.

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात ध्वजवंदन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत देखील ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र, भोर तालुक्यातील सावरदरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत फडकवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत फडकविण्यात आलेला ध्वज त्याच दिवशी सायंकाळी न उतरवता दोन दिवस त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
 
संजय पापळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर प्रवीण नांदे, शीतल टापरे,अहमद पटेल अशी निलंबित करण्यात आलेल्या
शिक्षकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सावरदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी राष्ट्रध्वज फडकवला होता. नियमाप्रमाणे सायंकाळी 5 वाजता सन्मानपूर्वक उतरवायला हवा होता. परंतु मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बेफिकिरीमुळे त्यादिवशी राष्ट्रध्वज उतरवण्यात आला नाही.दुसऱ्या दिवशी रात्रं – दिवस ध्वज तसाच होता. याची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी 3 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास राष्ट्रध्वज उतरवला आणि राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला.
 
तर तात्काळ निलंबनाची कारवाई.

गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी संबंधित शिक्षकांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला.त्यानंतर गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी मुख्याध्यापकासह तीन प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले.याचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला आहे.तसेच भोर पंचायत समितीकडून सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटीस काढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.