आजऱ्यात राम मंदिरात मनसेची आरती पोलीस बंदोबस्तात शांततेत .
आजरा. – प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात मनसेची आरती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी केलेल्या आदेशाचे पालन व आजानाचा आवाज बंद होत नसेल तर याबाबत मनसे अध्यक्ष यांनी दिलेला आदेशाचे पालन करत मनसे पदाधिकारी आजरा येथील राम मंदिर मध्ये आरती करण्यात आली. यापूर्वीच सकाळी मनसे पदाधिकारी यांना आजरा पोलीस स्टेशन यादी नोटीस जारी केली होती.
आजरा मनसे पदाधिकारी यांनी आजरा पोलीस स्टेशन यांना पत्र देऊन आरती करण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. सदर निवेदनामध्ये आपण आजरा शहरातील सर्व मशीद धारक समितीला आपण मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरण्याबाबत विनंती करावी. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अजूनही आमचं आंदोलन थांबले नाही जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उचलत नाही आमचे आंदोलन सुरूच राहील असे मनसे पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या राम मंदिर आजरा येथे आरती करणेसाठी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, सचिव चंद्रकांत सांबरेकर, वसंत घाटगे, प्रदीप पाटील, परशुराम पोतनीस, सुरज पाटील, सुधाकर पोतनीस, निवृत्ती माडकुत, सह मनसैनिक उपस्थित होते.
