Homeकोंकण - ठाणेआजरा साखर कारखान्याच्या सन. २०२२/२३ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक करार करून...

आजरा साखर कारखान्याच्या सन. २०२२/२३ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक करार करून घेण्यास सुरुवात. – चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे

आजरा साखर कारखान्याच्या सन. २०२२/२३ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक करार करून घेण्यास सुरुवात. – चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे

आजरा. प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्यामार्फत सन २०२२/२३ गळीत हंगामासाठी लागणाऱ्या तोडणी वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रियेचा दि. ३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते पहिल्या पाच ऊस तोडणी वाहतुकीचे करार करून शुभारंभ झाला हंगाम २०२२ /२३ पूर्ण क्षमतेने घेण्याचे धोरण कारखान्याच्या व्यवस्थापनाने केलेले असून कारखान्याचा गळीत हंगाम २०२२/२३ हा व्यवस्थित रित्या पार पाडणे याकरिता कारखाना यंत्रसामग्री देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच कारखान्यांमध्ये दररोज ऊस गळीत होऊन अंदाजे १४० दिवस गणित करून एकूण ४५० लाख मेट्रिक टन उसाचे गणित करण्याचे शेती विभागामार्फत नियोजन केले आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातून ५ हजार हेक्‍टर व कार्यक्षेत्राबाहेरील ५ हजार असे एकूण १० हजार हेक्‍टर क्षेत्राच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज अखेर एकूण ७ हजार ८५२ हेक्‍टर क्षेत्राची नोंद पूर्ण केले आहे. त्याच बरोबर तोडणी वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रक व छकडी अशा एकूण २६० बीड व १५० स्थानिक यंत्रणेचे करार करणार आहे. तसेच कारखाना हंगाम सुरू करण्यासाठी आम. श्री. आबिटकर यांनी सतत प्रयत्न व मार्गदर्शन केले आहे कारखाना कार्यक्षेत्रातील व इतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले तसेच कार्यक्षेत्रात ऊस वाढीसाठी प्रयत्न करणे बाबत मार्गदर्शन सूचना केल्या आणि पुढील हंगाम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या तरी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार आणि कागदपत्राची पूर्तता करून वेळेत करार करण्याचे आहे. जेणेकरून करार पोटी ऍडव्हान्स वाटप करणे सोयीचे होईल असे चेअरमन सुनील शिंत्रे यांनी सांगितले सदर प्रसंगी संचालक मधुकर देसाई, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, कार्यकारी संचालक डॉ. टि. ए. भोसले, सेक्रेटरी व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेजर श्री. गुजरगुजर, चिप केमिस्ट गणेश पाटील चिप, अकाउंट शेती अधिकारी एस एन व्हरकट व कारखाना कर्मचारी व तोडणी वाहतूक कंत्राटदार या वेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.