आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा सहकारी साखर कारखाना येथील अधिकारी व कर्मचारी काम करत असताना आपल्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाहीत. व त्यांना किरकोळ होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात यामुळे वेळीच याची दक्षता व व न घेतल्याने भविष्यात त्याचा मोठ्या आजारावर सामना करावा लागतो. यामुळे किरकोळ आजाराकडे आणि दगदगीच्या जीवनात होत असलेल्या त्रासाकडे वेळीच लक्ष देऊन त्यावर उपचार केलेल्या भविष्यात मोठ्या आजाराचा बळी पडणार नाही. व आपले आरोग्य चांगले राहील या उद्देशाने आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे दि. ३० रोजी डॉ. राहुल पाटील कन्सल्टन्सी जनरल फिजिशियन व त्याचे संस्थापक लाईफ लाईन हॉस्पिटल आजरा यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून कारखाना का रस्ता व कर्मचाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली व आरोग्य बाबत सूचना करण्यात आल्या कारखाना संस्थापक स्वर्गीय कै, वसंतराव देसाई यांच्या पुतळ्यास हार घालून वैद्यकीय तपासणी शिबिर सुरुवात करण्यात आली यावेळी कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे, व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर संचालक मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई मलिककुमार बुरुड, दशरथ अमृते जनादन टोपले, अनिल फडके लक्ष्मण गुडुळकर, आनंदा कांबळे तानाजी देसाई, विलास नाईक कार्यकारी संचालक डॉ. टि. भोसले सेक्रेटरी व्ही. के. ज्योती, मॅनेजर टेक्नी व्ही. एच. गुजर, चिप.केमिस्ट गणेश पाटील, लेबर ऑफिसर सुभाष भादनकर, कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश देसाई सह सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते.