Homeकोंकण - ठाणेचिंताजनक :-कोरोनाचा आलेख वाढताच.- गेल्या २४ तासांत ३६८८ नवे कोरोनाबाधित. - ५९...

चिंताजनक :-कोरोनाचा आलेख वाढताच.- गेल्या २४ तासांत ३६८८ नवे कोरोनाबाधित. – ५९ जणांचा मृत्यू

चिंताजनक :-
कोरोनाचा आलेख वाढताच.- गेल्या २४ तासांत ३६८८ नवे कोरोनाबाधित. – ५९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – वृत्तसंस्था. ३०

देशात पूर्णपणे कमी झालेला करोना पुन्हा एकदा आपले डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.  कारण देशात मागील 24 तासांत नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 3 हजार 688 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शुक्रवारी दिवसभरात 2755 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3377 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 60 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची करोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 इतकी झाली आहे.

शुक्रवारी दिवसभरात देशात 2755 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 803 इतकी झाली आहे.

देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 22 हजार 377 रुग्ण करोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 96 हजार 640 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.