आज दि २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पहा फक्त सह्याद्रीवर.
मुंबई. – प्रतिनिधी.
• डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी “सौर उर्जा कुंपणाचा” समावेश.
(वन विभाग)
• देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता
(वन विभाग)
• येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)
• पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार
(गृह विभाग)
• विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व सवलतींचा, इतर लाभांचा सर्वंकष अभ्यास करुन अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशी.
(इतर मागास बहुजन कल्याण)
• गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील अतिरिक्त उस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती, वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता
(सहकार विभाग)
अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान
( उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार.