सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त सापडला.- मसेनेच्या पाठापूराव्याला यश.
( आजरा कासार कांडगाव-जेऊर रस्ताच्या कामाला सुरुवात.)
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा कासार कांडगाव-जेऊर हा चंदगड व आजरा तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. गेली कित्तेक वर्ष या रस्त्यात खड्यांचे साम्राज्य नादुरुस्त असा रस्ता होता. हा रस्ता व्हावा यासाठी गेली दोन वर्ष आजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा बांधकाम विभाग कार्यालयाकडे पाठापुरावा करत होती. माहे फेब्रुवारी २०२१ मध्ये यासाठी बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदन देऊन यम व रेड्यासह आंदोलन केले होते. त्यानंतर माहे संप्टेंबर २०२१ मध्ये परत या कार्यालयाला निवेदन दिले होते. त्यानंतर सतत बांधकाम विभागाशी संपर्कात राहून सदर दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यास भाग पाडले सद्यस्थितीत निधी जरी अपुरा असला तरी यापुढे पूर्ण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास सतत पाठपूरावा करावा. या विभागातील लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे व पदाधिकारी मन सैनिक यांनी व्यक्त केले आहे.
