Homeकोंकण - ठाणेस्वामी विवेकानंद नागरी सह संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यानांचे लोकार्पण सोहळा संपन्न.

स्वामी विवेकानंद नागरी सह संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यानांचे लोकार्पण सोहळा संपन्न.

स्वामी विवेकानंद नागरी सह संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यानांचे लोकार्पण सोहळा संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यानांचे दि. २८ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत पाटील हस्ते झाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आम. सुरेश हाळवणकर, तर प्रमुख पाहुणे हिंदुराव शेळके होते.
प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन जनार्धन टोपले यांनी केले आम. श्री पाटील बोलताना म्हणाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच आजरा मध्ये येतील स्वामी विवेकानंद पतसंस्थेने आजरा मधील कमी असणारी गोष्ट म्हणजे उद्यान होती. पी पूर्ण करून ज्येष्ठ नागरिकांसह बाल गोपाळाना महिलांना या उद्यानाचा आनंद घेता येणार आहे. मागील काळात पतसंस्थेची परिस्थिती फार बिकट होती. आमच्या काळात काही नवीन निर्णय घेण्यात आले व संस्थेच्या हिताचे ठरले एनपीए मध्ये झिरो टक्के असणाऱ्या संस्थांना सहकार्य केले व संस्था सुरळीत होण्यासाठी मदत केली स्वामी विवेकानंद संस्थेने समाजातील छोटा घटक म्हणजे महिला बचत गट अशा बचत गटांना योग्य ती मदत केली आजऱ्याचे नेते भाजपचे उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी अखंडपणे भाजप मध्ये असणार असल्या चा दिलेला शब्द पाळावा. लवकरच देवेंद्रजीना आजरा मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आम.श्री. पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी आम. स सुरेश हाळवणकर बोलताना म्हणाले पन्नास वर्ष आर्थिक परिस्थिती नसताना ही संस्था अखंडपणे चांगल्या पद्धतीने काम करते धनदांडग्यांना कर्ज कोणीही देईल पण सर्वसामान्य माणसाला व्यवसाय मधील उभा करण्यासाठी स्वामी विवेकानंद पतसंस्थेने पाठबळ दिले आहे. लक्ष्मी देवी देवस्थान समितीच्या सर्व सदस्यांचे त्यांनी स्वागत केले सदर जागा उद्यानासाठी दिल्याबद्दल धन्यवाद मानले भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके, अशोक चराटी, यांनी मनोगत व्यक्त केले चेअरमन श्री. टोपले बोलताना म्हणाले स्वामी विवेकानंद संस्थेच्या वाटचाल तसेच स्वामी विवेकानंद पतसंस्था यांची आजरेकरांना सुवर्णमहोत्सव निमित्त भेट असल्याचे श्री टोपले यांनी बोलताना सांगितले. यावेळी नगरसेवक विलास नाईक, आजरा अर्बन चेअरमन डॉ.अनिल देशपांडे, नाथाजी पाटील, सह स्वामी विवेकानंद पतसंस्थाचे संचालक सर्व सभासद कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार व्हा.चेअरमन दयानंद भुसारी यांनी आभार मानले.
समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.