Homeकोंकण - ठाणेबेलेवाडी हु॥ गावातील दिव्यांग शेतकरी अरुण कुदळेनी केला .- सोन्या व सम्राट...

बेलेवाडी हु॥ गावातील दिव्यांग शेतकरी अरुण कुदळेनी केला .- सोन्या व सम्राट बैलांचा वाढदिवस केला मोठ्या थाटात.

बेलेवाडी हु॥ गावातील दिव्यांग शेतकरी अरुण कुदळेनी केला .- सोन्या व सम्राट बैलांचा वाढदिवस केला मोठ्या थाटात.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील बेलेवाडी हु॥ येथील दिव्यांग शेतकरी अरुण शंकर कुदळे यांनी आपल्या सोन्या व सम्राट या बैलांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचे योजिले आणि आख्या गावासमोर एक नवा आदर्श घालून दिला. त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे., कारण आपण कृषी संस्कृतीशी निगडित जीवन जगत असताना आपल्या घरातील लेकराप्रमाणेच जनावरांचीही देखभाल,काळजी,प्रेम करत असतो. आपल्या मालकाचा उभा संसार खांद्यावर घेऊन आयुष्यभर संसाराचा गाडा ओढणारी आपली बैलजोडी त्यांच्याशी घरचेच एक सदस्य म्हणून जिव्हाळा निर्माण होणे सहाजिक आहे. जनावराला जनावरा सारखीच वागणूक देणे या संकल्पनेला फाटा देऊन आपल्या मुलांप्रमाणेच जीवापाड माया लावणारे अरूण कुदळे आपल्या बैलांच्या कष्टाची त्यांच्या उपकाराची कृतज्ञता म्हणून आज त्यांचा वाढदिवस स्नेहभोजन घालून मोठ्या दिमाखात साजरा करत आहेत. ही नक्की आपल्या गावासाठी,पंचक्रोशीसाठी प्रेरणादायी व आदर्शवत बाब आहे. पायाने दिव्यांग असणारे अरुण कुदळे यांची हलाखीची परिस्थिती, कष्ट करून जगण्याची जिद्द हे सर्व पाहून भाजप जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी अरुण यांना शेतीची अवजारे खरेदी करण्यास आर्थिक मदत करून त्यांचे बळ वाढवले. भविष्यातही अशा या आपल्या बैलांच्या प्रती संवेदनशील मन असणाऱ्या तरूण शेतकरी अरुण यांना जमेल ते सहकार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मी समजतो. अरूण मित्रा, तुझ्या या अनोख्या संकल्पनेला सलाम…
देवाच्या कृपेने तुझ्या बैलांना निरोगी दिर्घायुष्य लाभो याच वाढदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! अशा गावान सोन्या -व सम्राट या बैलाना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.