विजेच्या धक्क्याने शिरसंगी ता. आजरा येथील तरुणाचा मृत्यू
आजरा. प्रतिनिधी.
आजरा शिरसंगी येथील माजी उप. सरपंच प्रकाश कानडे यांचा चिरंजीव प्रशांत प्रकाश कानडे वय २२ याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याचे समजते.
दि २३ रोजी रात्री मोटर चालू करण्यासाठी शेतावर गेले असता विजेच्या धक्क्याने प्रशांत याचा जागीच मृत्यू झाला आहे. नेसरी ता.गडहिंग्लज येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम चे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते