आजऱ्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने. – आरोग्य शिबीर संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी. २०
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी , उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अनिल माळी गट विकास अधिकारी बी.डी.वाघ आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.. शिवराज देसाई, वैद्यकीय अधिकारी ए.एस .फर्नांडिस, डॉ. वैशाली केळकर, डॉ असिफ बागवान, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर आरोग्य अभियान कार्यक्रमात संत गजानन राज हॉस्पिटल महागाव येथील डॉक्टर धीरज खडकबन, डॉ.सेजल गोयल, (कर्करोग शस्त्रक्रिया) मायक्रो रेडिएशन डॉ. शैलजा गुजरकर नेत्रतज्ञ डॉ. पी. एन. पवार, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. युवराज पाटोळे बाल रोग तज्ञ डॉ. राजदीप होडगे, जनरल सर्जन डॉ. सतीश हनुमंतशेट्टी, मूत्र विकार तज्ञ तसेच देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज यांचे डॉ. रोहित देसाई हृदयरोग तज्ञ डॉ. प्रियंका पाटील फिजिशियन डॉ. स्मिता भरणारी स्त्री रोग तज्ञ इत्यादी तज्ञांच्या मार्फत एकूण ३९७ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. यापैकी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयात संदर्भात करण्यात आलेले रुग्ण सर्जन २७ ई. एन. टी ७, नेत्र १५, सर्जन १७, स्त्रीरोग ४ असे एकूण ४७ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आली आहे. तसेच सदर शिबिरामध्ये सर्व सुविधा मोफत देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत मिशन अंतर्गत युनिक हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले जन आरोग्य अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात आले. सदर मेळाव्या मध्ये जि. प. उपाध्यक्ष
श्री. शिंपी यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना म्हणाले या देशात आरोग्याबाबत हेळसांड आहे. शासनाकडून गावात विविध उपक्रम राबवले जात असले तरी समाजाकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम कसे राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली तर या आरोग्य योजना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा यावर डॉ. सागर डॉ. स्वाती इंगवले, डॉ. प्रतिक्षा कोरे डॉ. स्वाती रेडेकर डॉ. कुराडे श्री मकानदार श्री गंधारी श्री करले अन्य अधिकारी व कर्मचारी स्वयंसेवक उपस्थित होते. किरण तज्ञ श्री मिलिंद गुरव कनिष्ठ लिपिक श्री सोपान बुधवंत यांनी स्वागत व प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले आरोग्य कर्मचारी युनूस सय्यद यांनी मान्यवरांचे आभार मानले.
