Homeकोंकण - ठाणेनिधी नसेल तर आमची मंगळसूत्रे घ्या. - वर्गणी काढतो पैसे देतो. -पण...

निधी नसेल तर आमची मंगळसूत्रे घ्या. – वर्गणी काढतो पैसे देतो. -पण हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करा. – आजरा मनसे महिलाही आक्रमक.( एक तासाहुन अधिक वेळ रस्तारोखो चक्काजाम..)

निधी नसेल तर आमची मंगळसूत्रे घ्या. – वर्गणी काढतो पैसे देतो. -पण हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करा. – आजरा मनसे महिलाही आक्रमक.
( एक तासाहुन अधिक वेळ रस्तारोखो चक्काजाम..)

आजरा. – प्रतिनिधी. १८

निधी नसेल तर आमची मंगळसूत्रे घ्या. वर्गणी काढतो पैसे देतो. पण हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करा. आजरा मनसे महिलाही आक्रमक होत एक तासाहुन अधिक वेळ चक्काजाम रस्तारोखो करण्यात आला.
आजरा येथे जीवघेणे खड्डे मुजवावे यासाठी हिक्टोरिया फुलावर आजरा मनसेने चक्काजाम रस्ता होतो करत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचा घोषणा देत निषेध केला. आजरा तालुक्याला जोडणारा संकेश्वर – गडहिंग्लज – आजरा – आंबोली हा मुख्य रस्ता व गोवा राज्याला जोडणारा रस्ता असून या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत मनसे आक्रमक होत. १६ मार्च २०२२ रोजी निवेदनाद्वारे माहिती दिली य निवेदनाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने २१ मार्च २०२२ रोजी आजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामार्गावरील जीवघेणे खड्यामध्ये वृक्षारोपन करुन आंदोलन केले होते. यावेळी तालुका प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे २५ मार्च २०२२ रोजी आपल्याला कार्यालय अधिकारी तालुका प्रशासन व मनसे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावली होती. आपण या बैठकीत चार दिवसात खड्डे भरून घेणे देण्याबाबतचे आश्वासन दिले होते. याबाबत कोणताही विचार न केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील प्रवासी नागरिकांना आपण दिलेला शब्द मनसेने केलेले आंदोलन यामध्ये कोणताही पाठपुरावा दिसत असल्यामुळे व आपल्याकडून दिशाभूल होत असल्यामुळे रस्त्याच्या खड्याबाबत नागरिकांच्या मध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. आपण या मार्गावर पडलेले खड्डे का ? मुजवु शकत नाही. याबाबत आपण लेखी व तोंडी स्वरूपात आंदोलनस्थळी येऊन नागरिकांसमोर सांगावे म्हणून आज मनसेला सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ रोजी चक्काजाम आंदोलनाचा प्रशासनाला सामोरे जावे लागेल आहे. या आंदोलनात जोपर्यंत आपण खड्डे
मुजवण्याचे काम सुरू करणार नाही. तोपर्यंत चक्काजाम आंदोलन थांबणार नाही. आजरा पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालय आजरा प्रशासन जबाबदार असणार नाही. याला सर्वस्वी महामार्ग प्रशासन जबाबदार असणार आहे. आम्ही यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या शब्दाला मान देऊन आंदोलन थांबले होते. परंतु आता थांबणार नाही. असे मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे यांनी बोलताना सांगितले. तर प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनीही प्रशासनाचा निषेध करत आपले मत व्यक्त केले व आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, ता. सचिव चंद्रकांत साबरेकर, आजरा शहरप्रमुख कुमार कांबळे, ता. उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, विश्वास केसरकर, वसंत घाटगे, अरुन देसाई, महिला आघाडी तेजस्वीनी देसाई, सह मनसे पदाधिकारी, मनसैनिक उपस्थित होते.

{ मनसे महिला पदाधिकारी ता. अध्यक्ष सरिता सावंत सह महिलांनी जमा केलेले दागिने व पदाधिकारी यांनी जमा केलेले पैसै मनसे पदाधिकारी देत असताना स्थानिक अधिकारी, व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी नको म्हणत रस्त्यातील खड्डे मुजवून घेण्याचे मान्य केले…आम्ही खड्डे मुजवतो पण आंदोलन थांबवा तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले. पण रस्त्यावरील खड्डे नाही मुजवले तर पुन्हा त्याच ठिकाणी आंदोलन सुरू होईल असा इशारा आंदोलकांनी दिल्यामुळे शेवटी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना लागलीच खड्डे मुजवून घेण्याचे काम सुरू करणे भाग पाडले. }

[ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डिजिटल फलकाला आरती करुन निधीची मागणी करत साहेब राष्ट्रीय महामार्ग यामध्ये धरलेल्या संकेश्वर आंबोली रोडला निधी लावा अशी मागणी केली. ]

[ आज दि. १८ रोजी राष्ट्रीय महामार्ग उप. अभियंता सौ बारटक्के, श्री फडतरे यांनी उपस्थिती दाखवली पण निधीचा अभाव असल्याने खड्डे मुजवण्याचा निर्णय घेता येत नव्हता यामुळे वाहतूक एक तासाहून अधिक काळ झाले दोन्ही बाजूला दहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर खड्डे मुजवणे प्रशासनाला भाग पडले. ] [ व्हिक्टोरिया फुलावर खोदकाम करणारे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.