आम्हाला पराभव मान्य. –
चंद्रकांतदादा पाटील
( तर चंद्रकात पाटलांच्या घराबाहेर शुकशुकाट. )
कोल्हापूर :- प्रतिनिधी.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कामगिरीची परीक्षा ठरलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव विजयी झाल्या.18 हजार 901 मतांची आघाडी घेत त्यांनी विजय संपादन केला.
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘अण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केलाय. मात्र निवडणुकीच्या वेळी सर्वाधिक चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे चंद्रकांत पाटील.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कोल्हापूरच्या जागेसाठी मोठी ताकद लावली होती. अखेर हा पराभव मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. निकालानंतर पाटील यांचं घर आणि भाजप कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली.
पूर परिस्थिती, विमानतळ विस्तारीकरण हे विकासाचे मुद्दे मान्य नाहीत, असं बंटी पाटलांना म्हणायचंय का?
मी हा पराभव मान्य करतो
येणाऱ्या काळात मोदी सरकारचे कोल्हापूरसाठी मोठे प्लॅन्स आहेत.
हिंदुत्व हा आमचा श्वास आमचा राजकीय अजेंडा नाही.
आम्ही थकलो नाही. इंदिरा गांधीच्या हत्येच्या वेळी दोन खासदार होते. त्यावर आम्ही हार मानली नाही.
आमचं कुटुंब आहे. कोणाच्याही घरी लग्न असले तरी आम्ही जातो.
