Homeकोंकण - ठाणेजीवघेणे खड्डे मुजवावे व हिक्टोरिया फुलावर खुदाई केलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा....

जीवघेणे खड्डे मुजवावे व हिक्टोरिया फुलावर खुदाई केलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. – आजरा मनसेची मागणी. ( उप अभियंता सौ पी.जी.बारटक्के यांना निवेदन. )( सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ रोजी चक्काजाम आंदोलन.)

जीवघेणे खड्डे मुजवावे व हिक्टोरिया फुलावर खुदाई केलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. – आजरा मनसेची मागणी. ( उप अभियंता सौ पी.जी.बारटक्के यांना निवेदन. )
( सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ रोजी चक्काजाम आंदोलन.)

आजरा. – प्रतिनिधी. १४.

आजरा तालुक्याला जोडणारा संकेश्वर – गडहिंग्लज – आजरा – आंबोली हा मुख्य रस्ता व गोवा राज्याला जोडणारा रस्ता असून या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत आजरा मनसेने राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता यांना निवेदन दिले आहे हे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या कार्यालयाकडे १६ मार्च २०२२ रोजी निवेदनाद्वारे आपणास कळवले होते. त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही न झाल्याने २१ मार्च २०२२ रोजी आजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामार्गावरील जीवघेणे खड्यामध्ये वृक्षारोपन करुन आंदोलन केले होते. यावेळी तालुका प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे २५ मार्च २०२२ रोजी आपल्याला कार्यालय अधिकारी तालुका प्रशासन व मनसे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावली होती. आपण या बैठकीत चार दिवसात खड्डे भरून घेणे देण्याबाबतचे आश्वासन दिले होते. याबाबत कोणताही विचार न केलेल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील प्रवासी नागरिकांना आपण दिलेला शब्द मनसेने केलेले आंदोलन यामध्ये कोणताही पाठपुरावा दिसत असल्यामुळे व आपल्याकडून दिशाभूल होत असल्यामुळे रस्त्याच्या खड्याबाबत नागरिकांच्या मध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. आपण या मार्गावर पडलेले खड्डे का शोधू शकत नाही. याबाबत आपण लेखी व तोंडी स्वरूपात आंदोलनस्थळी येऊन नागरिकांसमोर सांगावे परंतु येणाऱ्या दोन दिवसात आपण जीवघेणे खड्डे बुजवले नाहीत. व हिक्टोरिया पुलावर केलेली खुदाई सदर ठेकेदारावर आपल्या कार्यालयाकडून गुन्हा दाखल केला जात नाही. यामुळे पुन्हा आजरा मनसेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे. म्हणून सोमवार दि. १८ एप्रिल २०२२ रोजी चक्काजाम आंदोलनाचा प्रशासनाला सामोरे जावे लागेल या आंदोलनात जोपर्यंत आपण खड्डे बुजवण्याचे काम सुरू करणार नाही. तोपर्यंत चक्काजाम आंदोलन थांबणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी आजरा पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालय आजरा प्रशासन जबाबदार असणार नाही. याला सर्वस्वी महामार्ग प्रशासन जबाबदार असणार आहे. आम्ही यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या शब्दाला मान देऊन आंदोलन थांबले होते. परंतु आता थांबणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबतचे निवेदन सौ पी.जी.बारटक्के उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, ता. सचिव चंद्रकांत साबरेकर, माजी सचिव संतोष शिंवगंड, आजरा शहरप्रमुख कुमार कांबळे, ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, महिला आघाडी तेजस्वीनी देसाई, उमा संकपाळ, सह मनसे पदाधिकारी, मनसैनिक उपस्थित होते.

[ आज दि. १४ रोजी राष्ट्रीय महामार्ग उप. अभियंता सौ. बारटक्के यांनी हिक्टोरिया फुलावर केलेली खुदाईची पाहणी केली. व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर तपासणी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या मार्गावर पडलेली जीवघेणे खड्डे मुजवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडे निधी उपलब्ध नसून यापूर्वी केलेल्या कामाची देखील पाहणी करण्यासाठी कर्मचारी वर्ग देखील कमी आहे. आमच्या वरिष्ठ अधिकारीशी सदर फुलावर केलेली खुदाई. व रस्त्यातील खड्डे याबाबतची माहिती देऊन निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो व धोकादायक फुलावर केलेल्या खुदाईबाबत चौकशी करून सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे शेवटी सौ बारटक्के यांनी बोलताना सांगितले. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.