श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन.
आजरा. – प्रतिनिधी. १३.
आजरा येथील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात वतीने दरवर्षी मराठी भाषेतील कादंबरी गद्य साहित्य नाट्यलेखन व बाल साहित्य करिता पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीपासून कविता संग्रहासाठी नव्याने पुरस्कार योजना सुरु केली आहे .या पुरस्काराकरिता साहित्यिक प्रकाकांनी पुस्तके पाठवण्याचे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठीतील दर्जेदार उत्तम साहित्य मूल्य लाभलेल्या कादंबरीला मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत कादंबरी पुरस्कार दिला जातो. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व रोख २५०१ रु. असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणिय गद्य साहित्य पुरस्कार यंदा पुरस्काराकरिता समिश्रा ललित गद्य चरित्र वैचारिक आदी वाग्मय अपेक्षित आहे. सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व रोख २००१ रु. असे या पुरस्काराचे स्वरुप आहे दाजी टोपले नाट्यलेखन पुरस्कारासाठी प्रकाशित अप्रकाशित नाट्यसंहिता स्वीकारल्या जातील सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व रोख १५०१ रु. असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बाल साहित्य पुरस्कारासाठी सर्व प्रकारचे बाल साहित्य विचारात घेतले जाईल सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व रोख १५०१ रु असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठीतील दर्जेदार व उत्तम साहित्य मूल्य लाभलेल्या काव्यसंग्रहासाठी “मैत्र काव्य” पुरस्कार या वर्षीपासून सुरू केला आहे. सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व रोप २५०१ रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारा करिता सन २०२१ सालात प्रथम प्रकाशित झालेली पुस्तकाची एक प्रत अध्यक्ष श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा, ता. – आजरा, जिल्हा – कोल्हापूर पिन. ४१६५०५ या पत्त्यावर दि. ३० एप्रिल २०२२ पंर्यत पाठवावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक बाचुळकर, उपाध्यक्षा गीता पोतदार कार्यवाहक सदाशिव मोरे, विजय राजोपाध्ये व संचालक मंडळ यांनी केले आहे.