आजरा मनसे विद्यार्थी सेनेचे- आजरा आगाराला निवेदन मासिक पास चालू करा. – अन्यथा विद्यार्थी मोफत प्रवास करतील.- ता अध्यक्ष अश्विन राणे
आजरा. – प्रतिनिधी. १३.
आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आजरा आगार व्यवस्थापनाला विद्यार्थी सेनेचे ता. अध्यक्ष अश्विन राणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की कोरोणा काळानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दृष्ट्या फार हाल झाले आहेत. कोरोणा काळानंतर राज्यामध्ये शाळा महाविद्यालय सुरू झाली व दिवाळी तोंडावर असताना एस.टी कामगारांचा संप झाला. या संपामुळे विद्यार्थ्यांचे शालेय जीवन ही अडचणीचे झाले सध्या गेल्या एक महिन्यापासून एस.टी कामगार काही प्रमाणात रुजू होत आहेत. परंतु न्यायालयाने लढ्यामध्ये न्यायदेवतेने दिलेल्या निर्णयानुसार व कामावर हजर राहण्यास महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ यांनी केलेल्या विनंती तसेच सामाजिक बांधिलकी जपत काही वाहक – चालक कामावर रुजू झाले आहेत. यामध्ये ११० पेक्षा अधिक फेऱ्या चालू असल्याचे समजते माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय कोरोणा काळात बंद झाले असले कारणाने अभ्यासक्रम मागे राहत होता. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मिळणाऱ्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या असून अधिकच्या शिकवणीतून अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी हे शेतकरी व गरीब कुटुंबातील असल्या कारणाने दैनंदिन ये – जा करण्याचा खर्च परवडत नाही. यासाठी आजरा आगारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मासिक पास मिळावा अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे करत आहोत. या निवेदनाचा त्वरित विचार करून संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना कळवावे व आपला झालेल्या निर्णय पत्राने आम्हाला कळवावा. याबाबत येणाऱ्या चार दिवसात आपल्या वरिष्ठांना कडून आपण निर्णय नाही दिल्यास आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आपला प्रवास मोफत करतील त्यांच्याकडून तिकीट दर आकरला जाऊ नये. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर विद्यार्थी सेना सचिव ओमकार माडभगत, विभाग प्रमुख वैष्णवी दळवी तसेच जगदीश मिसाळ, विलास येसणे, श्रेयस केरकर, स्वप्निल सुतार आदींच्या सह्या आहेत.
