HomeUncategorizedशालेय विद्यार्थ्यांचे एसटी पास कधी विद्यार्थी प्रतीक्षेत. - आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील...

शालेय विद्यार्थ्यांचे एसटी पास कधी विद्यार्थी प्रतीक्षेत. – आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मागणी

शालेय विद्यार्थ्यांचे एसटी पास कधी विद्यार्थी प्रतीक्षेत. – आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मागणी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील आगारात १०४ पेक्षा अधिक फेऱ्या सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील ज्या – ज्या गावांमध्ये व विभागातील एस. टी फेऱ्या सुरू आहेत. अशा गावातील तालुक्याला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पास देण्यात यावा अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांकडून होत आहे. तर दैनंदिन तालुक्यात कामावर येणाऱ्या कामगार वर्गाला पास देण्यात यावा अशी मागणी कामगार वर्गातून देखील मागणी होत आहे.
गेल्या बऱ्याच महिन्यापासून एसटी कामगार संपामुळे बंद असलेल्या एसटी फेर्‍या काही प्रमाणात चालू झाले आहेत आता नियमित चालू झालेल्या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी गैर असे होऊ नये पालकांच्या खिशाला खाजगी वाहनांना अधिक पैसे द्यावे लागत आहेत यासाठी मासिक पास देणे गरजेचे आहे याबाबत राजकीय पक्ष मंडळीदेखील अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करताहेत याबाबतची मागणी किंवा पाठपुरावा आजरा आगारात केला जात नाही आहे. यासाठी याबाबत पाठपुरावा होऊन शालेय विद्यार्थ्यांना मासिक पास मिळाल्यास पालकांच्या खिशाला लागणारी कात्री थांबणार आहे. आजरा आगारातील बरेच वाहक व चालक कामावर हजर झाले असून हजर न झालेल्या वाहक – चालकांनी न्यायालयीन लढा चालू ठेवून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपत कामावर हजर राहावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन याबाबत शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय. पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. म्हणून यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.