आजरा – गडहिंग्लज – आंबोली. – मार्गावर खड्डेच खड्डे. – मनसेच्या आंदोलनाला – निवेदनाला महामार्ग अधिकाऱ्यांकडून केराची टोपली.
आजरा. – प्रतिनिधी. १३
येथील आजरा – गडहिंग्लज – आंबोली. – मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. या रस्त्याच्या खड्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका पदाधिकारी यांनी निवेदन देऊन विनंती करून देखील या रस्त्याकडे महामार्ग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत रस्ता रोको करून पुन्हा या बाबतची बैठक व निवेदन देऊन आठ दिवसाची वेळ देण्यात आली होती या आश्वासनाला पंधरा-वीस दिवसाचा कालावधी संपला तरीही अद्यापही जीवघेण्या खात्यातून नागरिकांना पर्यटकांना प्रवास करावा लागत आहे यामुळे मनसेच्या आंदोलनालासह – निवेदनालाही महामार्ग अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली असे म्हणावे लागेल.
या खड्डेमय रस्त्याबाबत भाजप किंवा महाविकास आघाडी मधील नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष आहेच. मग या खड्डेमय झालेल्या रस्त्यांना वाली कोण असा प्रश्न ? उपस्थित होत आहे.
या रस्त्यावरून रोजचे अपघात आजही सुरूच आहेत. तरीही महामार्ग जिल्ह्याचे अधिकारी या गोष्टीकडे गांभीर्याने का? पाहत नाही
महामार्ग अधिकारी व आजरा येथील स्थानिक प्रशासन व मनसे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन रस्त्यात पडलेले खड्डे मुजवण्याचे नियोजन करण्याबाबत चे आश्वासन महामार्ग अधिकारी यांनी दिले होते. यानंतर दिलेल्या मुदतीत रस्त्यात पडलेले खड्डे मुजवले नाहीतर आजरा मनसे पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. तो इशाराही थांबला आहे. परंतु आजरा येथील तहसील विभागातील कर्मचारी संपावर असल्यामुळे सदर खड्ड्यांचा विषय बारगळला असावा परंतु हा रस्ता महामार्ग अधिकारी यांच्याकडे असल्यामुळे यातून मार्ग काढून लवकरच या रस्त्यात पडलेले जीवघेणे खड्डे मुजवावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. यामुळे मनसेच्या आंदोलनाची धार बोथट झाली काय अशी चर्चा होत आहे.