प्रतिभानगर कोल्हापूर येथे स्वमालकीच्या इमारतीमध्ये बँकेचा नवीन डाटा सेंटरचे उद्घाटन. – चेअरमन आजरा अर्बन.
कोल्हापूर. – प्रतिनिधी. १२
दि. आजरा अर्बन को ऑफ बँक ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये ३२ शाखा कार्यरत असून बँकेचा एकूण व्यवसाय १२०० शे कोटी आहे. ऐतिहासिक आणि व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिभा नगर येथील शाखेचे नाव मोठे मानले जाते. या बँकेत सर्व डिजिटल सेवा आणि पेमेंट सिस्टम बँकेकडे उपलब्ध आहेत. यासाठी सर्वात जलद आणि अखंडित सेवा देण्यासाठी बँकेने प्रतिभा नगर कोल्हापूर या स्वमालकीच्या इमारतीमध्ये नवीन डाटा सेंटर स्थापन केलेले आहेत. या सेंटर उद्घाटन चेअरमन मेनन अँड मेनन लिमिटेड कंपनीचे चेअरमन एडवोकेट मॅनेजमेंट डायरेक्टर विजय मेनन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ करतेवेळी श्री मेमन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ग्रामीण भागात स्थापन झालेल्या आजरा बँकेने केलेल्या प्रगतीबद्दल बँकेच्या सर्व संचालकांनी अभिनंदन केले सदर कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी बँकेची माहिती देताना बँके मार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. तसेच बँकेचे व्हा. चेअरमन किशोर भुसारी यांच्या व सौभाग्य यावेळी बँकेचे संचालक सुरेश डांग, विलास नाईक प्रकाश वाटवे डॉ. दीपक सातोस्कर रमेश कुरुनकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅ सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, हिरण्यकेशी स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष अनिकेत चराटी तसेच प्रतिभा नगर शाखेचे मार्गदर्शक केशव तिरोडकर, बिंदू चौक शाखेचे मार्गदर्शक रमेश मोरे, रंकाळा शाखेचे मार्गदर्शक विलास बेडगे, शिवाजी कोंडेकर, गोकुळ शिरगाव बँकेचे मार्गदर्शक शशिकांत खोत, विल्सन मंतरो, किरण महाजन, संगणक विभागाचे मुख्य अधिकारी मिलिंद पुजारी, प्रतिभानगर शाखा अधिकारी मिलिंद सूर्यवंशी, बँकेचे सभासद ग्राहक हितचिंतक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

आजरा अर्बन मुख्य शाखा