Homeकोंकण - ठाणेस्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा वतीने व्याख्यानमाला कार्यक्रम. ...

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा वतीने व्याख्यानमाला कार्यक्रम. (व्याख्यान.- १८ एप्रिल २०२२ रोजी. सायं ५.३० वा. )

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा वतीने व्याख्यानमाला कार्यक्रम.

आजरा. – प्रतिनिधी. १२

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसह आजरा तालुक्यातील नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या एक विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते डॉ. सागर देशपांडे असून व्याख्यानमालेचा विषय “करिअर घडवताना” असा आहे. गंगामाई वाचन मंदिर सभागृहात दि. १८ एप्रिल २०२२ रोजी सायं.५.३० वा. होणार असून या व्याख्यानमालेचा सर्वानी लाभ घ्यावा असे अवाहन चेअरमन जनार्दन टोपले, व्हा. चेअरमन दयानंद भुसारी, व्यवस्थापक अर्जुन कुंभार सह संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.