दि. आजरा अर्बन बँकेची बांबवडे शाखा स्थलांतर. – व ए. टी. एम उद्घाटन कार्यक्रम संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी. ११
दि. आजरा अर्बन को ऑफ बँक ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत असून शाखा बांबवडे बँकेचा एकूण व्यवसाय १२०० शे कोटी आहे. बँकेच्या एकूण ३२ शाखा पैकी बांबवडे ही शाखा १९९७ पासून कार्यरत आहे ऐतिहासिक आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे गाव मोठे मानले जाते या गावातील बँकेची शाखा ही व्यवसायाच्या दृष्टीकोणातून अधिक प्रशस्त जागेमध्ये स्थलांतर आणि नवीन ए.टी.एम सेंटरचा शुभारंभ गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य व के.डी.सी.सी बँकेचे संचालक सर्जेराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमावेळी श्री गायकवाड व श्री पाटील यांनी बँकेविषयी गौरव उद्गार काढून शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना उद्योगधंद्यांसाठी व शेतीसाठी सर्व सहकार्य दिल्याबद्दल बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी बँकेची माहिती देताना बँके मार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. तसेच बँकेचे व्हा. चेअरमन किशोर भुसारी यांच्या व सौभाग्यवती निरुपमा भुसारी यांच्या हस्ते नवीन जागेत सत्यनारायण पूजा करण्यात आली. यावेळी बँकेचे संचालक सुरेश डांग, विलास नाईक प्रकाश वाटवे डॉ. दीपक सातोस्कर रमेश कुरुनकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅ सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे तसेच बांबवडे शाखेचे मार्गदर्शक विठ्ठल तोडकर, अमृत वाकडे, मलकापूर शाखेचे मार्गदर्शक अविनाश सोनटक्के, ज्ञानदेव महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर आदी उपस्थित होते
