राम- राज्याच्या वेळेपासून ब्रिटिश येईपर्यंत शेती समृद्ध होती. – आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज. – दिवीज पठारे. – सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन.
आजरा. – प्रतिनिधी. १०
राम– राज्याच्या वेळेपासून ब्रिटिश येईपर्यंत भारतात शेती सेंद्रिय व समृद्ध होती. पण आता ही शेती कॅन्सर शेती झाली आहे. पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे दिवीज पठारे सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेश, आजरा महाल शिक्षण सस्था, अण्णाभाऊ संस्था समूह, व आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी च्या वतीने येथील शेतकऱ्यांना कार्बन क्रिएट फंडाचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा या आयोजित केलेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

प्रास्ताविक आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी केले. तर स्वागत डॉ. अनिल देशपांडे यांनी केले श्री. पठारे पुढे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले शेतकऱ्यांनी केमिकल युक्त शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे सद्या पर्यावरणाच्या दृष्टीने व कॅन्सर मुक्त शेती करणे काळाची गरज आहे, यापूर्वी हा कार्बन क्रेडीट फंड जागतिक बँक प्रदूषण कमी करण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी देत होती, सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी जागतिक बँक हा फंड शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे. तसेच सभासद झाल्यानंतर आपल्या जमिनीचे सॅटेलाईट मार्फत निरीक्षणे नोंदवून त्या जमिनीमध्ये प्रत्येक गुंठ्याच्या भागात किती न्युट्रीशन व्हल्यू (किती कसदार जमीन आहे ) जमिनीमध्ये कार्बनडाय ऑक्साईड षोशून घेण्याची शक्ती आहे, यावर कार्बन क्रेडीट फंड अवलंबून आहे. तसेच अति केमिकल युक्त खत वापरामुळे व फवारणीमुळे क्षारपड झालेल्या जमिनीची सुधारणा करून घेता येईल या संबंधीचे रिपोर्ट रोज सभासदाच्या मोबाईल वर पाठवले जातील. त्या अनुषंगाने त्या जमिनीमध्ये सुधारणा करून ती जमीन सेंद्रिय शेतीकडे वळवता येईल. या नोंदणीची मुदत फक्त २२ एप्रिल २०२२ पर्यंतच आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे आधारकार्ड, ७/१२ व ८ अ, सभासदाच्या पत्नीचा बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर व प्रत्यक्ष जमिनीवर जावून जमिनीचे अक्षांश व रेखाअंश याची नोंद घेण्यात येईल सदरचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी हि कंपनी प्रती दिवस १ रु. चार्ज आकारणार आहे. या योजनेबाबत कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. असे शेतकरी मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक सिद्धगिरी मठाचे मठाधीपती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी व कर्नाटक राज्य सेंद्रिय शेती चळवळीचे प्रमुख ए.एस.आनंदजी यांनी मार्गदर्शन करत आहेत. तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे श्री पठारे मार्गदर्शन करताना म्हणाले. अध्यक्षीय मनोगत श्री शिंपी म्हणाले कार्बन फंड या पूर्वी औद्योगिक क्षेत्रात दिला जात होता. आता जागतिक बँक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व आपली शेती सुपीक व्हावी यासाठी हा फंड देत आहे. तरी आजरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. शिंपी यांनी केले. या शेतकरी मेळाव्यात भिकाजी गुरव, एस.पी.कांबळे, नगरसेवक अभिषेक शिंपी, विलास नाईक तसेच शिवाजी गुरव, के. व्ही. येसने, रामचंद्र मुरुकटे, संभाजी जाधव, सह आजरा तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच आजी – माजी सरपंच सदस्य तालुक्यातील हजारो शेतकरी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले. आजरा समृद्धीचे संचालक नारायण मुरुकटे आभार मानले.

{ यावेळी मनसेचे नेते पुंडलिकभाऊ जाधव, शेतकरी मंडळाचे संभाजी सावंत, कृषिभूषण आप्पासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर शेतकरी मेळाव्याच्या चर्चासत्रात पांडुरंग लोंढे, संभाजी इंजल, बास्तु बारदेस्कर, संभाजी वळदर, अनिकेत चराटी, सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. }
