Homeकोंकण - ठाणेकार्बन क्रेडीट फंडाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन. – जि.प.उपाध्यक्ष...

कार्बन क्रेडीट फंडाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन. – जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी . ( रविवार १० रोजी होणार मार्गदर्शक मेळावा.)

कार्बन क्रेडीट फंडाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन. – जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी . ( रविवार १० रोजी होणार मार्गदर्शक मेळावा.)

आजरा. – प्रतिनिधी. ०७

आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कार्बन क्रेडीट फंडाचा लाभ मिळावा यासाठी रविवार दि. १०/०४/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी दिली. शेतकऱ्यांना केमिकल युक्त शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे का वळावे यासाठी महाल शिक्षण समूह, अण्णा भाऊ संस्था समूह तसेच सिध्दगिरी गुरुकुल फाउंडेशन व आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या सयुंक्त विद्यमानाने माहिती देण्यात येणार आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना केमिकल युक्त शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे याबाबतची माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करत आहोत. सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने व कॅन्सर मुक्त शेती करणे काळाची गरज आहे, यापूर्वी हा कार्बन क्रेडीट फंड जागतिक बँक प्रदूषण कमी करण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी देत होती, सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी जागतिक बँक हा फंड शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे. तसेच सभासद झाल्यानंतर आपल्या जमिनीचे सॅटेलाईट मार्फत निरीक्षणे नोंदवून त्या जमिनीमध्ये प्रत्येक गुंठ्याच्या भागात किती न्युट्रीशन व्हल्यू (किती कसदार जमीन आहे ) जमिनीमध्ये कार्बनडाय ऑक्साईड षोशून घेण्याची शक्ती आहे, यावर कार्बन क्रेडीट फंड अवलंबून आहे. तसेच अति केमिकल युक्त खत वापरामुळे व फवारणीमुळे क्षारपड झालेल्या जमिनीची सुधारणा करून घेता येईल या संबंधीचे रिपोर्ट रोज सभासदाच्या मोबाईल वर पाठवले जातील. त्या अनुषंगाने त्या जमिनीमध्ये सुधारणा करून ती जमीन सेंद्रिय शेतीकडे वळवता येईल. या नोंदणीची मुदत फक्त २२ एप्रिल २०२२ पर्यंतच आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे आधारकार्ड, ७/१२ व ८ अ, सभासदाच्या पत्नीचा बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर व प्रत्यक्ष जमिनीवर जावून जमिनीचे अक्षांश व रेखाअंश याची नोंद घेण्यात येईल.सदरचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी हि कंपनी प्रती दिवस १ रु. चार्ज आकारणार आहे. या योजनेबाबत कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत व ते कार्बन क्रेडीट फंडाचा लाभ घेत आहेत. याबाबत कनेरीमठ येथे सोमवार ०४ एप्रिल रोजी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक. –
-सिद्धगिरी मठाचे मठाधीपती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी व कर्नाटक राज्य सेंद्रिय शेती चळवळीचे प्रमुख ए.एस.आनंदजी यांनी मार्गदर्शन केले होते.
१) कार्बन क्रेडिट काय आहे? २) कार्बन क्रेडिट कसे मिळवावे? ३)यासाठी संघ स्थापन कशी करायची ? ४) शेतीउत्पन्न वाढण्यास ह्याचा कसा लाभ घेता येईल?
या अनुषंगाने आजरा येथील अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल या ठिकाणी रविवार दिनांक १० रोजी सकाळी १० वा. शेतकरी मार्गदर्शक मेळावा आयोजित केला आहे. तरी आजरा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूनी या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांना उपस्थित राहण्यासंबंधी विनंती केली आहे. तसेच या योजनेसाठी काम करणारे दिवीज पाठारे तसेच प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी आजरा तालुक्यातील खातेदार शेतकरी यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून कार्बन क्रेडीट फंड या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी जि.प.चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी अण्णा भाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोक चराटी, तसेच आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे संचालक मंडळ यांनी पत्रकार परिषदेतुन अवाहन केले आहे. यावेळी डॉ.अनिल देशपांडे, नारायण मुरुकटे, रामचंद्र मुरुकटे, संभाजी जाधव, अनिकेत चराटी आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.