आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट .- ए. बी. एच. ए योजनेअंतर्गत हेल्थ आयडी कॅम्प ला वडकशिवाले येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
आजरा. – प्रतिनिधी. ०६
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात वडकशिवाले ता. आजरा हि तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असून लोकनियुक्त सरपंच संतोष बेलवाडे यांच्या माध्यमातून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सरपंच श्री बेलवाडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुरु असलेल्या कॅम्प मध्ये आरोग्य वर्धिनी केंद्राच्या सी. एच. ओ प्रतिज्ञा चव्हाण व शीतल सिस्टर यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व ऑपरेटर धीरज पाटील च्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.यासाठी ग्रामस्थ बाबुराव संकपाळ, बाजीराव लोखंडे, राहुल कांबळे, आशा सेविका अपर्णा पाटील, ऑपेरेटर शरद बिरंबोळे यांचे सहकार्य लाभले.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच बाबुराव कांबळे, जेष्ठ नागरिक तुकाराम गोईलकर, शंकर कदम, दत्तात्रय खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील कॅम्प शनिवार दि ९ एप्रिल २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडकशिवाले