Homeकोंकण - ठाणेआजरा मनसेचा आक्रमक पवित्रा - रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्यातुन फिरवले - महामार्ग...

आजरा मनसेचा आक्रमक पवित्रा – रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्यातुन फिरवले – महामार्ग अधिकाऱ्यांना

आजरा मनसेचा आक्रमक पवित्रा – रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्यातुन फिरवले – महामार्ग अधिकाऱ्यांना

आजरा. प्रतिनिधी. २५

आजरा मनसेचा आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्यातुन फिरवत महामार्ग अधिकाऱ्यांना खड्ड्यांचे दर्शन घडवून दिले. आजरा – आंबोली रोडवर होणाऱ्या महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे याबाबत आजरा मनसे यांनी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महामार्ग प्रशासनाचा सोमवार दि. २१ रोजी आजरा आंबोली रोड रस्त्यावर बसून ठिया आंदोलन करत महामार्ग प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती यावेळी मनसे पदाधिकारी यांना प्रशासन इशारा दिला होता महामार्गाचे अधिकारी याठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबले जाणार नाही. याबाबत महामार्ग प्रशासनाची बैठक आयोजित करावी असा हट्ट मनसे पदाधिकार यांनी धरला होता. यावेळी नायब तहसीलदार डी.डी. कोळी यांनी आंदोलकांशी चर्चा करताना नॅशनल महामार्गाच्या अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी शुक्रवार दि. २५ रोजी महामार्ग स्थानिक प्रशासन यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल आपण या बैठकीसाठी उपस्थित रहावे अशा सूचना आजरा तहसिल विभागातून देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने दि. २५ रोजी उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार विकास आहीर सपो. निरीक्षक सुनिल हारगुडे, व महामार्ग अधिकारी इंद्रजीत फडतरे तसेच आजरा मनसे पदाधिकारी यांच्यासमवेत आजरा तहसील कार्यालयात आजरा हद्दीतील आंबोली पर्यंत असणाऱ्या महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे याबाबत या मार्गावर ये – जा करणाऱ्या स्थानिक नागरिक, आजरा प्रशासन, व पर्यटकांची परिस्थिती काय होत आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती उपविभागीय अधिकारी सौ बारवे सह स्थानिक अधिकारी यांनी यांनी केली. मनसे पदाधिकारी आणि जोपर्यंत महामार्ग होणार नाही. तोपर्यंत आपण हा रस्त्याची डागडुजी केली पाहिजेत व सध्या पडलेले खड्डे चार दिवसांमध्ये मुजवून घ्यावे. व आपला एक निवासी अधिकारी गडहिंग्लज – आजरा या विभागासाठी देण्यात यावा. आपला मोबाईल नॉटरिचेबल लागतो असे न होता येथील समस्या काय आहेत. हे सांगण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अधिकार नसल्यामुळे याठिकाणी आंदोलकांना व प्रशासनाला काय निर्णय घ्यावा. याबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. आपण अशा वेळी कोणतेही प्रतिक्रिया देत नाही. अशी भूमिका या बैठकीत आजरा मनसे पदाधिकारी यांनी मांडली. या चर्चेनंतर महामार्ग अधिकारी श्री फडतरे यांना सोबत घेऊन मनसे पदाधिकारी यांनी संपूर्ण रस्त्याची परस्थिती अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. व येणाऱ्या चार दिवसात हे जीवघेणे खड्डे मुजवावे व काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार हे फक्त मलमपट्टी करत असतात यांच्यावर लक्ष ठेवावे. आजरा आंबोली महामार्ग खड्डेमुक्त करावा अन्यथा आजरा म्हणजे यांना पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल महामार्ग अधिकारी यांना सुनावले यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, ता. उपाध्यक्ष आनंदा घंटे, महिला आघाडी ता. अध्यक्ष सरिता सावंत यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी प्रकाश कांबळे, आजरा शहर अध्यक्ष कुमार कांबळे, महिला आघाडी उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई , वि. सेना. ता. अध्यक्ष अश्विन राणे, तसेच अरुन देसाई, ओमकार माडभगत, प्रदीप पाटील तुषार येजरे, अमर आपके, अभिजीत पाटील, प्रशांत ठोंबरे, अनिकेत पाटील, अवधूत सासुलकर सह महिला आघाडी पदाधिकारी, मनसैनिक या बैठकीला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.