कोटकामते ग्रामपंचायतीत 36 लाख 81 हजारांचा अपहार.
( सरपंच,ग्रामसेवकाच्या सहीने आर्थिक अपहार झाल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.)
देवगड :- प्रतिनिधी. २३
देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीने ३६ लाख ८१ हजार १०५ एवढ्या रकमेचा कॅशबुक आर्थिक व्यवहार अपहार झाल्याची फिर्याद देवगड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निलेश रमाकांत जगताप यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
सदरचा अपहार १एप्रिल २०१९ ते ३१मार्च २०२१ या आर्थिक वर्षात झाला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे हा अपहार,ग्रामनिधी, पाणी पुरवठा योजना, तेरावा, चौदावा पंधरावा वित्त आयोग, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना ,अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध जाती विकास योजना, त्याचबरोबर घरपट्टी पाणीपट्टी रक्कम ,हा आर्थिक व्यवहार अपहार विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीने झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले असून या घटनेसंदर्भात भादवि कलम ४०९,४०६,३४ नुसार देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.
