आजरा कारखान्याची ची १२ फेब्रुवारी अखेरची ऊस बिले जमा. ( आजरा साखर २०२१/२२ ची वाटचाल शेतकऱ्यांच्या हिताची ठरली.)
आजरा. – प्रतिनिधी. २२
आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्यास दि. १/२/२०२२ या कालावधीमध्ये गळीतास आलेला ३७०५३ .८४१ में टन. ऊसाची जाहीर ऊस दर प्र. में टन रु. २९०० प्रमाणे होणारी रु १० कोटी ७४ लाखाची ऊस बीले संबधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती वर्ग केली आहेत आजरा साखर कारखान्याने सन २०२१/२२ च्या गळीत हंगाम सुरु करुन १२४ दिवसात ३५००७४.६९१ में टन उसाचे गाळप होऊन सरासरी साखर उतारा १२.४२ % मिळाला आहे. कारखान्याने १ नोव्हेंबर २०२१ ते १२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये गळीतास आलेला ३०६५९८.१५८ में टन उसाची एकूण बिले रुपये ८८ कोटी ९१ लाख संबंधित शेतकऱ्यांना वेळेत अदा केली आहेत. तसेच तोडणी वाहतुकीची बिले १५ फेब्रुवारी २०२२ अखेर रुपये १६ कोटी ६३ लाख संबंधितांना अदा केली आहेत. कारखाना व्यवस्थापनाने ठरविल्यानुसार उर्वरित ऊस बिले व तोडणी वाहतूक दिले लवकरच आधार करण्याचे आश्वासन यावेळी चेअरमन सुनील शिंत्रे यांनी दिले त्याच प्रमाणे पूर्वीप्रमाणे हंगाम २०२२/२३ साठी कारखान्याच्या शेती ऑफिसशी संपर्क साधून आपल्या उसाची नोंद करावी असे सांगितले यावेळी कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, उदयसिंग देसाई, दशरथ अमृते, आनंदा कांबळे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक टि. ए. भोसले, सेक्रेटरी व्ही. के ज्योती, चिफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
