आजरा महाविद्यायामधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे मुरुडेत प्रारंभ
आजरा. – प्रतिनिधी. २३
आजरा महाविद्यायामधील राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे मुरुडे या गावी मंगळवार दिनांक २२/३/२०२२ ते २८/३/२०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.
शिबीराची सुरवात उद्घाटनाने झाली. सदर शिबिराचे उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.श्रम संस्कार म्हणजे आजच्या तरुणांमध्ये श्रमाचे संस्कार विकसीत करणे. अध्यक्षीय भाषणात विजयकुमार पाटील म्हणाले, स्वयं सेवकांनी केलेले कार्य हे समाजातील अनेक पिढ्यांना उपयोगी पडते, हे विधायक कार्य आहे. मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.राम मधाळे यांनी प्रास्ताविकेत आठवड्यातील नियोजित कार्यक्रमाची रूपरेखा ग्रामस्थांना सांगितली.
प्रभारी प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे व अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनिल पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत,१७ वर्षाआधी आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केलेल्या कार्याचा फायदा आजही ग्रामस्थांना होत आहे असा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.लता शेटे यांनी केले.
सदर कार्यक्रमात सूत्रसंचलन प्रा.रणजित पवार यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत प्रा.मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री.अमर पाटिल, ग्रा.स. अनिल पाटील, संगीता भाद वणकर व सरिता पोवार , उपप्राचार्य डी.पी. संकपाळ, कर्यालीन अधीक्षक श्री.योगेश पाटील, महाविद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, रा.से.यो. चे स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
