Homeकोंकण - ठाणेमुंबईहून श्रीनगरला केवळ २० तासांत पोहचता येणार .- २०२४ संपण्याच्या अगोदर भारतातील...

मुंबईहून श्रीनगरला केवळ २० तासांत पोहचता येणार .- २०२४ संपण्याच्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे असणार ”

मुंबईहून श्रीनगरला केवळ २० तासांत पोहचता येणार .- २०२४ संपण्याच्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे असणार ”

मुंबई. – प्रतिनिधी.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशभरातील रस्ते प्रकल्पांबाबत माहिती सादर केली. यावेळी त्यांनी मुंबई ते श्रीनगर हे अंतर रस्ते मार्गाने केवळ २० तासांत पूर्ण करता येईल, अशा प्रकारे मार्ग तयार केला जात आहे. तसेच, २०२४ च्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे झालेले असतील, असा दावा देखील गडकरींनी यावेळी केला.
फारुख अब्दुल्ला यांच्या प्रश्नावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते कामांची यादीच सादर केली. “केवळ जम्मू-काश्मीरसाठी आम्ही ६० हजार कोटींची कामं करत आहोत. जी जोझीला टनल बनत आहे. लडाख आणि लेहपासून श्रीनगरपर्यंत पोहचण्यासाठी किती अडचणी येत होत्या, आता तो झेरमोर बोगदा देखील तयार होत आहे. जोझिला टनलमध्ये सद्यस्थितीस एक हजार लोक उणे आठ डिग्री तापमानात आतमध्ये जाऊन काम करत आहेत. २०२६ मध्ये काम पूर्ण होण्याची तारीख होती परंतु मी त्यांना सांगितलं की २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर मला वाटतं की, हे एक ऐतिहासिक काम होईल.” असं गडकरी म्हणाले
.

श्रीनगर ते जम्मू दरम्यान महामार्ग –

तसेच, “लडाख आणि लेहमध्ये येण्या अगोदर जर आपण शिमलावरून मनालीपर्यंत जातो, तर मनालीमध्ये आपली अटल टनल बनली आहे, पूर्वी साडेतीन तास लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये पोहचतो. आता तिथून अटल टनलमधून निघाल्यानंतर हिमालयाच्यावरून तिथे इतकं सुंदर आहे की मी ते पूर्णपणे डोळ्यांमध्ये साठवू शकलो नाही. आम्ही चार टनल बनवत आहोत. लडाख, लेहमधून येण्यासाठी रस्ता बनवत आहोत, बराच बनला आहे. लडख, लेहपासून थेट कारगिल, कारगिलहून झेरमोर आणि झेरमोरहून श्रीनगर आणि मग श्रीनगर ते जम्मू दरम्यान आम्ही महामार्ग बनवत आहोत. त्याच पाच टनल बनवत आहोत. बरचसं काम झालं आहे.” अशी माहिती देखील गडकरी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.