Homeकोंकण - ठाणेविविध पुरस्काराने सन्मानित असलेली वर्षाविजय तावडे लिखित "अमृतधारा" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...

विविध पुरस्काराने सन्मानित असलेली वर्षाविजय तावडे लिखित “अमृतधारा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार रविवारी २० रोजी.

विविध पुरस्काराने सन्मानित असलेली वर्षाविजय तावडे लिखित “अमृतधारा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार रविवारी २० रोजी.

आजरा. – प्रतिनिधी.

राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित असलेली ग्रामीण भागातील आजरा तालुक्यात भादवण या गावात जन्म तर विवाहानंतर भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव या गावी सद्या वास्तव्यास मुंबई असा हा प्रवास करत राज्यातील उत्कृष्ट कवी, लेखिका वर्षाविजय तावडे लिखित “अमृतधारा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा . संपन्न होत आहे.
ऋचित प्रकाशन व कॉलेज कट्टा ग्रुप प्रकाशित व वर्षाविजय तावडे लिखित अस्सल ग्रामीण जीवनाचा बाज साकारलेल्या कथांची “अमृतधारा” रसिकांना सविनय सादर करण्याकरिता या अमृतधारा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. २०/३/२०२२ रोजी सकाळी ११ वा. हॉटेल मॉर्निंग स्टार सभाग्रह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष संदीप परब संस्थापक सेक्रेटरी. – जीवन आनंद संस्था कुडाळ,
तर प्रमुख पाहुणे संजय साबळे साहित्यिक चंदगड,
प्रमुख उपस्थिती ऋषिकेश वडके ऋचित प्रकाशक पुणे, राजीव टोपले – माजी उपप्राचार्य आजरा महाविद्यालय आजरा, अनुज केसरकर साहित्यिक. – मुंबई, राजेंद्र पाटील लेखक कवी कोल्हापूर गणपती चव्हाण अध्यक्ष आजरा तालुका ग्रंथालय संघटना अनुष्का गोवेकर नवोदित कवियत्री आजरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत आहेत.
तरी या सोहळ्यासाठी लेखिका वर्षा तावडे यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.