आजरा हालेवाडी तिट्टा बस स्थानकाला वालीकोण.
( बसस्थानकाच्या सभोवती गवत. – स्वच्छतेची जबाबदारी कोणाची.)
आजरा. – प्रतिनिधी. १९
आजरा येथील हालेवाडी तिट्टा बसस्थानकाच्या सभोवती वाढलेले गवत पहाता या बसस्थानकाडे देखभाल कोणाकडे आहे. या वाढलेल्या गवताच्या विळख्यातून बस स्थानकाला बाहेर कोण काढणार या गवतातुन मार्ग काढत शालेय विद्यार्थी व प्रवासी कडक उन्हात सावली शोधण्यासाठी जातात.
एस. टी. कर्मचारी संपामुळे दुर्लक्षित होत असलेली बसस्थानके अशा बसस्थानकाकडे स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जरी ही जबाबदारी कोणाची असली तरी संबंधित गावातील ग्रामस्थांनी किंवा शेतकरी मित्रांनी हे आजूबाजूचे वाढलेले गवत कापणे गरजेचं होतं. या फाट्यावरून तीन-चार गावचे नागरिक या बस स्थानकाचा लाभ घेतात पण बस स्थानक स्वच्छता करायला कोणालाही वेळ नाही. शालेय विद्यार्थी यांच्यासाठी तरी ही स्वच्छता करणे गरजेचे होतं परंतु असे न होता आजही हालेवाडी बसस्थानकाच्या भोवतीने तीन-चार फूट उंच वाढलेले गवत या गवताच्या विळख्यात अडकलेले बस स्थानक यातून कोण सामाजिक कार्यकर्ता पुढे येऊन या बस स्थानकाची स्वच्छता करेल का. ? या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या शेतामध्ये स्वच्छता आहे परंतु बस स्थानक परिसरामध्ये गवताचं जंगल झालेले आहे. अनेक तरुण मंडळे राजकीय पक्ष स्वच्छता अभियान. ..स्वच्छ भारत अभियान राबवतात मग हे बस स्थानक परिसर स्वच्छ कराव असं कोणाला का वाटलं नाही.
