आजरा साखर मार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीचे ऊस लागवड तंत्रज्ञान माहिती पुस्तिका वाटप.
आजरा. प्रतिनिधी. १६
आजरा साखर कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रात उसाची वाढ होण्यासाठी ऊस विकास विभागामार्फत ऊस उत्पादन वाढीच्या शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी ऊस लागवड तंत्रज्ञान माहिती पुस्तिका कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांच्या हस्ते देण्यात आली. सदर पुस्तिका मध्ये जमिनीच्या पूर्व मशागत ऊस लागवड ऊस बेणे प्रक्रिया रासायनिक खताची मात्रा अंतर मशागत मोठ बांधणी पाणी, व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचे फायदे, खोडवा व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्य रोग व किड नियंत्रण इत्यादी बाबतची माहिती सविस्तर देण्यात आली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या सूचनांचे अवलंबून करून कमीत कमी क्षेत्रामध्ये ऊस उत्पादनामध्ये वाढ व्हावी. या दृष्टीने प्रयत्न करावे व अधिक माहितीसाठी कारखान्याच्या ऊस विभागाशी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा असे यावेळी चेअरमन श्री शिंत्रे यांनी सांगितले याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री शिंत्रे व्हा. चेअरमन आनंदा कुलकर्णी संचालक दिगंबर देसाई सुधिर देसाई संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सुनिता रेडेकर, विजयालक्ष्मी देसाई संचालक मुकुंदादा देसाई, एम. के.देसाई दशरथ अमृते, अनिल फडके, जनाधर टोपले, राजेंद्र सावंत, आनंदा कांबळे, तानाजी देसाई तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक टी. ए. भोसले जनरल मॅनेजर श्री सावंत, गुजर प्रॉडक्शन मॅनेजर एस. बी. मल्हारी, सेक्रेटरी व्हि. के. ज्योती इन. लेबर ऑफिसर एस. पी. भादवनकर, कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश देसाई व सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
