Homeकोंकण - ठाणेखरे लाभार्थी बाजूला. - महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदणीची फेर...

खरे लाभार्थी बाजूला. – महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदणीची फेर तपासणी व्हावी. – आजरा मनसेची मागणी.

खरे लाभार्थी बाजूला. – महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदणीची फेर तपासणी व्हावी. – आजरा मनसेची मागणी.

आजरा. प्रतिनिधी. १५

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार महामंडळ मार्फत विविध कामगारांच्या नोंदणीचे कामकाज सध्या सर्वत्र सुरु आहे. त्यामध्ये गवंडी सेंट्रींग काम करणारे मजूर ग्रामपंचायत कडे बांधकाम विषयक कामकाज करणारे मजूर सह वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या मजुरांना कामगारांच्या नोंदणीचे कामकाज सुरू आहे. आजरा तालुक्यामध्ये सदर कामगारांची नोंदणी ही खाजगी दलालांमार्फत सुरू असून याला पक्षीय वळन दिले जात आहे. काही दलालाकडून बहुतेक कामगारांची यामध्ये पैसे स्वीकारून नोंदणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचे स्वरूप ठेवून कामगारांची नोंदणी करण्याचे कामकाज सुरु आहे. यामध्ये अनेक बोगस कामगार सुद्धा नोंदणी करून घेत आहेत. अशा प्रकारे गैरमार्गाने नोंदणी करण्याचे कामकाज सध्या आजरा तालुक्यामध्ये सुरू असून सदर प्रकरणाबाबत योग्य ती चौकशी होऊन खऱ्या अर्थाने जे शासन निकषानुसार कामगार आहेत. अशाच कामगारांची नोंदणी व्हावी. व यामध्ये कोणत्याही कामगारांची लूट होणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई करणे बाबत आपल्याकडून कळवण्यात यावे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका पदाधिकारी यांची तात्काळ बैठक लावून याबाबत चर्चा करण्यात यावी सदर निवेदनाच्या अनुषंगाने असेच बांधकाम कामगारांची लूट सुरू राहिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास संबंधित कार्यालय जबाबदार राहील. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, सचिव चंद्रकांत सांबरेकर अश्विन राणे कुमार कांबळे सह मनसे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

{ खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यास मनसेचा विरोध नाही. – जिल्हा उपाध्यक्ष मनसे सुधीर सुपल.- महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत असलेली बांधकाम कामगार नोंदणी ही फक्त लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नसून अनेक बोगस कामगार याचा लाभ घेत आहेत. यासाठी पक्षीय कार्यकर्ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोगस नोंदणी करून घेत आहेत. तरी यामध्ये काही दलालही सामील आहेत. ही कोणतीही सेवा नसून होऊ घातलेली निवडणुकीची मते मिळवणे व पैसे उकळण्याचा धंदा काढला आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने कोणी कामगारही नाहीत अशा लोकांची नोंदणी करून घेतलेली आहे यामुळे शासनावर आर्थिक बोजा वाढणार आहे तरी सुरू असलेली बोगसगिरी थांबावावी अन्यथा या बोगस नोंदणी करणाऱ्या दलालांना कायदा दाखवावा लागेल. }

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.