शाळा प्रगतीचे मंदीर बनावे
संजय मोहिते,
( पेरणोलीत व्यवसथापन समिती प्रशिक्षण.)
आजरा : – प्रतिनिधी. १३
शाळा व्यवस्थापन समिती ही विद्यार्थी, पालक व शिक्षकामधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून शाळा हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मंदिर बनावे असे प्रतिपादन संजय मोहिते यांनी केले. पेरणोली ता आजरा येथे पाच गावातील व्यवस्थापन समिती सदस्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पेरणोली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा सावंत होते. मोहिते म्हणाले, शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण होणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणानूसार तीन ते सहा वयोगटातील मुलांना स्वतंत्र शिक्षण देणार असून सर्वांच्या सहाकार्यातून शाळा चालविण्यासाठी सहनियंत्रण समिती स्थापन होणार आहे.यावेळी विजय कांबळे, कृष्णा सावंत, सुर्यकांत दोरूगडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संदीप नावलकर, जनार्दन देसाई,संताजी सोले, ऊदय कोडक,विना रेळेकर,रवींद्र नावलकर,धनाजी पाटील, इम्रान तासेवाले,जयश्री वरेकर, कविता नाईक,अनुष्का गोवेकर, सुप्रिया पाटील,आबासाहेब शेडेकर,तृप्ती पाटील, बाळकृष्ण दोरूगडे,मनिषा नरके,जयदीप दोरूगडे आदी उपस्थित होते.