कानोलीत उद्या १ कोटी २५ लाख विकासकामांचा शुभारंभ. – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांची उपस्थिती.
आजरा (प्रतिनिधी )
कानोली (ता.आजरा )येथील गावाच्या १ कोटी २५ लाख खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ रविवार (दि.१३)रोजी सकाळी ठीक ९वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावच्या पिण्याच्या पाण्याचा नळपाणी जलकुंभ योजनेसाठी ६९लाख ,आमदार फंडातून कानोली अंतर्गत मुख्य रस्ता डांबरीकरण २०लाख ,पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून ब्लॉकमधील रस्ता खडीकरण, ५लाख तसेच ब्लॉकमधील अंतर्गत रस्ता डांबरीकरण ६लाख ,आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून कानोली ते निंगुडगे रस्ता मजबुतीकरण आणि कानोली वेस ते नदीघाट रस्ता या कामासाठी २५लाख अशी विकासकामे आहेत त्याचा शुभारंभ व उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम आहे.तसेच जिल्हा बँक व गोकुळ दूध संघ नूतन संचालक सत्कार ही होणार आहे.या कार्यक्रमासाठी कानोली गावचे सेवानिवृत्त अधिकारी जोतिबा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई,जिल्हाबँक संचालक सुधीरभाऊ देसाई,गोकुळ संचालिका अंजनताई रेडकर,सभापती उदयदादा पोवार ,अल्बर्ट डिसोझा,विष्णुपंत केसरकर, एम के देसाई,राजू होलम,अनिल फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे अहवान सरपंच राजेंद्र मुरुकटे यांनी केले आहे