१४ मार्च रोजी मलिग्रे येथे जागतिक महिला दिना निमित्त कार्यक्रम व मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील मौजे मलिग्रे येथे ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त सोमवार दि .१४ मार्च २०२२ रोजी कार्यक्रम व मोफत आरोग्य शिबीर हे महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन , राष्ट्रीय घरेलु कामगार चळवळ व महाराष्ट्र इंडियन कॅन्सर सोसायटी , मुंबई तर्फे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि .आणि संगोपन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर ऑन्फो – लाईफ कॅन्सर सेंटर नरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विनाशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे . या शिबीराला मुक्ती संघर्ष समिती , सत्यशोधक सेक्युलर फ्रंट , महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती यांनी सहकार्य केलेले आहे . इंडियन कॅन्सर सोसायटी , मुंबई तर्फे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि .आणि संगोपन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर ऑन्फो लाईफ कॅन्सर सेंटर नरेवाडी , प्राथमिक आरोग्य केंद्र , मलिग्रे आणि आरोग्यासाठी सामाजिक कृती कार्यक्रम यांच्यावतीने लोकांची आरोग्य तपासणी होणार आहे . हे शिबीर विनाशुल्क म . जोतिराव फुले विद्या मंदिर मलिग्रे येथे आयोजित केले आहे . या शिबीरात पुढील तपासण्या मोफत केल्या जातील.पुरुषांसाठी संपूर्ण शारीरिक व मौखिक तपासणी , स्त्रीयांसाठी स्त्री रोग तज्ञांकडून संपूर्ण शारीरिक व स्तनांची तपासणी , कर्क रोगाची पुर्व लक्षणे , गर्भाशय व बीजकोषकॅन्सरची लक्षणे , स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे , तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे याची तपासणी होणार आहे.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे यांनी वेगवेगळ्या आजारांबाबत तपासणी करून लोकांना आरोग्य सेवांचा लाभ देणार आहे . तरी नागरिकांनी या शिबीरामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन करणेत आलेले आहे . यावेळी संग्राम सावंत, समन्वयक महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन;लक्ष्मी कांबळे,राज्य सदस्या; रेश्मा कांबळे लीडर महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन महाराष्ट्र,संजय घाटगे-प्रधान सचिव राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समिती;शिवाजी भुगुत्रे-अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मलिग्रे; बाळु कांबळे,संघटक-मुक्ती संघर्ष समिती; शितल केंगारे,विद्या शिंदे, सुरेखा निंबाळकर,छाया पारदे,नंदाताई माणगावकर,शकुंतला बोरनाक,गिता कांबळे,मंगल कांबळे,जयश्री कांबळे,सोनाली बळे, लीडर महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन उपस्थित होते.
