शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही मिळाल्यास. – कायदा हातात घ्यावा लागेल – माजी खासदार राजू शेट्टी.
( आजरा येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती. )
आजरा. – प्रतिनिधी. – ११
शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही मिळाल्यास वेळ पडल्यास कायदा हातात घ्यावा लागेल याबबात राज्यभर धरणे – आंदोलन शेतकरी संघटनच्या वतीने सुरू होती. कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झाले होते. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी सह अनेक मागण्यासाठी महावितरणच्या विरोधात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद माहिती दिली. स्वागत इंद्रजित देसाई यांनी केले प्रास्ताविक राज्य संघटक राजेंद्र गड्डेन्नवार यांनी केले यावेळी माजी खासदार श्री शेट्टी पुढे म्हणाले. शेतकऱ्यांना दहा तास वीज देणे शक्य असल्याचे ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत पटवून दिले आहे. याबाबत ऊर्जा मंत्री यांनी आम्ही समितीसमोर विषय ठेवून आपल्याला कळवतो. त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर येईल अशी अपेक्षा आहे. आम्ही विजेच्या प्रत्येक युनिटचा हिशोब केलेला आहे. यामध्ये गलथान कारभार उघड होणार आहे. असे झाल्यास महावितरणची कपडे काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात ८४ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारसांना १४ लाख रुपये मिळणारी नुकसान भरपाई दिली जात नाही. परंतु सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नाही परंतु सर्पाला मारल्यानंतर गुन्हा मात्र दाखल होतो. अशी अनेक वेगवेगळी धोरणे शासनाला बदलावी लागतील यामध्ये शेतकऱ्याची चुकी नसतानाही ही आपला जीव गमवावा लागतो यामधील मुख्य कारण रात्रीची रात्री ११ ते पहाटे ४ आम्हाला वीज नको तर दिवसा वीज मिळावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटना आंदोलन छेडताना अनेक दुसऱ्या मागण्या आहेत यामध्ये वाढीव बिले, रेडींग मध्ये वाढ, असे वेगळे मुद्दे आहेत. या सर्व बाबी वर समिती नेमून तपासून घेतो असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे परंतु हेतू स्वच्छ ठेवा प्रश्न मार्गी लागेल असे आम्ही सांगितले आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात महावितरण व ऊर्जामंत्री यांनी योग्य निर्णय नाही दिल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन उभा करण्यात येईल असे माजी खासदार श्री शेट्टी म्हणाले.
( महावितरणच्या धरणे आंदोलन बाबत आजरा तालुक्यातील देवर्डे येथील बाबु आढाव या शेतकऱ्याने माजी खासदार श्री शेट्टी यांना ( फळ ) फनस भेट देऊन सत्कार केला. )
यावेळी माजी सभापती निवृत्ती कांबळे, संजय देसाई, श्रीपती गुरव, शांताराम पाटील, भिकाजी गुरव, बाबू आढाव, बी के कांबळे सर, सुरेश पाटील, मधुकर देसाई, आप्पासाहेब सरदेसाई, विठ्ठल आपके सह शेतकरी संघटना, गिरणी कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.