Homeकोंकण - ठाणेपोलिस असल्याची खोटी बतावणी करुन इचलकरंजीत . -४५ हजारांची रोकड लांबवली.

पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन इचलकरंजीत . -४५ हजारांची रोकड लांबवली.

पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन इचलकरंजीत . –
४५ हजारांची रोकड लांबवली.

इचलकरंजी. प्रतिनिधी. ०८

पोलिस असल्याची बतावणी करून दोन चोरट्यांनी नदीवेस नाका परिसरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ एका युवकाची ४५ हजारांची रोकड लांबवली. याबाबत संतोष संभाजी सतपाळकर (वय २१, रा.अब्दुललाट) याने गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सतपाळकर हा दुचाकीवरून कामावरून घरी निघाला होता. तो नदीवेस नाका येथे पोहचला असता पोलिस असल्याची बतावणी करून एकाने त्याला दुचाकीवरून श्री स्वामी समर्थ मंदिर जवळील रस्त्यावर अंधारात गेले. याचवेळी दुसऱ्या साथीदाराने संतोषला मागून पकडून त्याच्याकडील ४५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन दुचाकीवरून पलायन केले. याप्रकरणी सतपाळकर याने गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. गणेश वरुटे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.