अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मडिलगे ता. आजरा.
( ८ ते १४ मार्च.२०२२ स्थळ .- विठ्ठल रुक्माई मंदिर मडिलगे. )
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा मडिलगे येथील वारकरी संप्रदाय, तरुण मंडळे, सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ व ग्रामपंचायत मडिलगे देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि. ८ मार्च ते १४ मार्च २०२२ रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. तरी भक्तजनांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक मडिलगे यांनी भक्तजनांना व नागरिकांना केली आहे . सात दिवस चाललेल्या या सोहळ्यासाठी दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ६ काकडा आरती ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन व रात्री ११.३० ते बारा ३.३० हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम असून व्यासपीठ आधिपत्यक. ह. भ. प. श्री. दत्तात्रय निऊगरे आहेत.
या सोहळ्यासाठी कीर्तनकार दि रोजी ८ ह. भ. प तानाजी पाटील महाराज कोरीवडे, दि. ९ ह. भ. प. डॉ. एस. डी. पन्हाळर महाराज उत्तुर , दि. १० ह. भ. प. एकल महाराज जोगेवाडी. ता. राधानगरी, दि. ११ ह. भ. प. नारायण काळे महाराज आळंदी देवाची, दि. १२ ह. भ. प. आनंदा पाटील महाराज मळगे.ता.कागल, दि. १३ ह. भ. प. पांडुरंग कासार महाराज सांगली, दि. १४ ह. भ. प. वाघे महाराज, दि. १५ ७ ते ९ वा. ह. भ. प. वाघे महाराज आळंदी देवाची. लडकी कीर्तन होणार आहेत.
[ या सोहळ्यासाठी व्यवस्थापक मंडळ यांनी सूचना व विनंती केली आहे. की बाहेर गावाकडून येणाऱ्या कीर्तन दिंड्यांची भोजन व्यवस्था केली आहे. कृपया दिंड्या ज्या दिवशी येणार आहेत. त्या दिवशी व्यवस्थापनाकडे संपर्क साधावा व येणाऱ्या दिंड्यांनी सायंकाळी ७.३० पूर्वी यावे जेणेकरून त्यांची सेवा व्यवस्थितपणे करता येईल यांची नोंद घ्यावी. ]
