लढायचं ते जिंकण्यासाठीच’, महापालिका जिंकण्यासाठी मनसेचा नवा नारा. – मनसे अध्यक्ष राज ठाकरे.
मुंबई. प्रतिनिधी.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार महिन्यांपूर्वी पुण्याचे सातत्याने दौरे केले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच राज यांनी पक्षांतर्गत फेरबदलही केले होते.
जिंकण्यासाठी मनसेने (mns) कंबर कसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी चार महिन्यांपूर्वी पुण्याचे सातत्याने दौरे केले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच राज यांनी पक्षांतर्गत फेरबदलही केले होते. आता पुणे महापालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. लढायचं ते जिंकण्यासाठीच हा नारा मनसेकडून देण्यात आला आहे. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 16 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राज यांची सभा पार पडणार आहे. या सभेतूनच लढायचं ते जिंकण्यासाठी हा नारा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर होत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 7 ते 10 मार्च पर्यंत पुणे दौऱ्यावर आहेत. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असल्याने पुण्यातच हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील स्वारगेट येथे नेहरू स्टेडियम जवळील गणेश कला क्रीडा केंद्रावर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मनसेने पोस्टर्स तयार केले आहेत. या पोस्टर्सवर लढायचं ते जिंकण्यासाठीच असा नवा नारा छापण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्याया नव्या नाऱ्याला पुणेकर कशी दाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
