व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे
वय वर्षे ७० च्या पुढील वर्ग मित्रांचे स्नेहसंमेलन संपन्न.
आजरा. प्रतिनिधी. ०४
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये (बॅच १९६७/६८ ) वाढत्या ताण-तणावाच्या जीवनात एकमेकांना भेटणे, गप्पा मारणे, काही काळ संगतीत घालविणे फार महत्त्वाचे ठरते हा एक प्रकारचा विरंगुळा असतो काही काळ का असेना प्रिय जनांमध्ये भेटा भेटीमुळे मन आनंदित व प्रफुल्लित बनते. जुन्या सवंगड्यांना भेटण्याचा आनंद एक वेगळाच असतो. म्हणून डॉ. प्रा .शामराव पवार यांनी मनामध्ये एक संकल्पना घेऊन आपल्या बरोबर व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १९६४ ते १९६८ या बॅचच्या वर्ग मित्रांचा मेळावा अर्थात स्नेहसंमेलन घ्यायचे ठरविले. काही वर्ग मित्रांना त्यानुसार फोन करून विचार विनिमय केला परंतु त्यांच्या दृष्टीने हे अशक्यप्राय असल्याचे सांगितले कारण सुमारे पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ज्येष्ठ व्यक्तींना आजरा सारख्या ठिकाणी एकत्र आणणे जरा कठीणच आहे असे म्हंटले जात होते परंतु स्वतः कोल्हापूर येथे राहून सुद्धा आजऱ्यातील काही वर्ग मित्रांशी हाताशी धरून बर्याचशा वर्ग मित्रांशी फोनवरून संपर्क करून जास्तीत जास्त संख्येने आजरा येथे व्यंकटराव हायस्कूल येथे दि.२७/२/२०२२ रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

इतक्या वर्षांनी आपणास एकमेकांना भेटायला मिळणार म्हणून सर्वच खुश व आनंदी वृत्तीने बोलत होते. तो दिवस उजाडला आणि सर्वजण एकत्र प्रशालेत जमले.. अल्पोपहारानंतर कार्यक्रम पत्रिकेनुसार ठरल्याप्रमाणे स्नेहसंमेलन कार्यक्रम सुरु झाला. वर्ग मित्रांची खूपच गर्दी आली होती. सर्वप्रथम सर्व मित्र सरस्वती देवी पूजनासाठी देवीच्या मूर्तीपुढे उभे राहिले आयोजक वर्गमित्र श्री शामराव पवार यांच्या हस्ते सरस्वती देवीची हळदकुंकू वाहून पूजा केली देवीला पुष्पहार अर्पण केला वर्गमित्र श्री. आयवाळे यांच्या हलगीच्या वादनाने सारे वातावरण दणाणून गेले होते वर्गमित्र आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष व जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपीसह सारेजण आपल्या पन्नास वर्षापूर्वीचा क्लास रूम मध्ये पुढील कार्यक्रमासाठी स्थानापन्न झाले. सर्वांचे चेहरे अगदी प्रसन्न झाले होते दिपप्रज्वलनंतर मान्यवरांची जागेवर सर्व श्री शिंपी व माजी शिक्षक एस डी चव्हाण सर सुतार सर व तसेच माजी प्राचार्य व विद्यमान संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा सुनील देसाई आणि डॉ प्रा शामराव पवार हे स्थानापन्न झाले सर्व उपस्थितांनी गत सालातील दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमासाठी शामराव पवार यांनी रचलेले स्वागत गीत सुंदररित्या सादर करण्यात आले सादर करते वर्गमित्र गणपतराव आयवाळे यांनी आपल्या वाद्यवृंदा सर अत्यंत प्रभावीपणे सादर केले सर्वांचे सहर्ष स्वागत करून डॉ.पवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना थोडक्यात केली आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वर्ग मित्रांच्या संमेलनाचा हेतू स्पष्ट केला प्रदीर्घ काळानंतर आपण भेटत असल्याचे त्यात त्यांनी सांगितले. तसेच कोरोणाच्या आपत्तीमुळे लोकांच्या चालण्या फिरण्यावर बंधन आले होते अशा वेळी गाठी भेठीला जीवनामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने लोकांना आपल्या मित्रांना भेटण्याचा आनंद लुटता यावा काही काळ मजेत जावा म्हणून मी हे स्नेहसंमेलन आयोजित केले असल्याचा प्रामाणिक हेतू सांगितला.त्यानंतर कार्यक्रमासाठी आमंत्रित गुरुजनांचा व मान्यवरांचा शाल श्रीफळ व फुल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर उत्सुर्त मनोगतामध्ये काही मित्रांनी आपली मनोगते सादर केली. त्यामध्ये आपल्या व्यंकटराव हायस्कूल मधील आपले शिक्षण त्यावेळच्या आठवणी गुरुजीं वर्ग व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले घडलेले जीवन अशी भावपूर्ण मनोगते काही मित्रांनी सादर केली.आपल्या शाळेचे ऋण व आपले कर्तव्यापोटी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वर्ग मित्रांकडून रुपये ५००० रकमेच्या वह्या व्यंकटराव हायस्कूल चे प्र.प्राचार्य सुरेश राव खोराटे यांचेकडे संयोजक डॉ प्रा शामराव पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात जमलेल्या प्रत्येक मित्राने समोर येऊन आपापली थोडक्यात ओळख करून दिली पन्नास वर्षाच्या अधिक कालावधी नंतर एकत्र आलो आहोत याचा त्यांना फार आनंद वाटत होता त्यानंतर ह्याच कार्यक्रमांतर्गत सर्वांना खुल्या प्रकारे एकमेकांशी संवाद गप्पा व विचारपूस करण्यासाठी वेळ दिला होता त्या मध्ये सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला संयोजकांचे आभार मानले गेले. त्यानंतर डॉ शामराव पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये हायस्कूलने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली. गुरुजींना याबाबत माहिती दिली आपल्या त्याकाळात हायस्कूलला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले ते सांगितले संस्थेचे कौतुक केले संस्थेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे नमूद केले.
आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वर्गमित्र श्री. शिंपी यांनी आपल्या बालवयातील शाळेतील आठवणी सांगितल्या कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्याची जर अपार इच्छा व तळमळ असेल तर तो आपल्यासमोर येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन शिक्षण घेण्याची आपली जिद्द पूर्ण करण्यास यशस्वी ठरतो व त्यानंतर आपण ठरवलेले ध्येय हे आपल्या दूरदृष्टी व वर्तमान काळात घेतलेल्या कष्टावर साध्य करता येते… त्यांनी सांगितले की इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेणे हे आपल्यासाठी फार कष्टदायी ठरले लहानपणीच पितृछत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच आपल्यावर पडली. परिस्थितीची ,गरिबीची जाण ठेवून त्या काळात कोणतेही काम हे कमी नसून याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे तर त्या कामातूनही आपल्याला जीवनाचा धडा मिळतो.. त्यांनी लहानपणी शाळा शिकत वर्तमानपत्र विकले, किराणा दुकान चालविले, व जुनी अकरावी १९६८ साली पूर्ण केली आणि याच बॅचचे हे सर्व आपले वर्गमित्र. अकरावीनंतर आपला वडिलोपार्जित लाकडाचा व्यापार केला त्यामध्ये पुन्हा परिस्थिती सुधारली.मग मागे वळून न पाहता शिक्षण घेत हा व्यवसाय सुरू केला.. त्यानंतर चांगले अर्थार्जन व्हावे म्हणून एक टॅंकर घेऊन तो गोकुळ साठी भाड्याने दिला.. त्यानंतर समाज सेवाभावी वृत्तीमुळे आजरा ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, आजरा साखर कारखान्याच्या निर्मितीत मोलाचे सहकार्य त्यामुळे संचालक उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या पदावर राहून कारखान्याचा शेतकऱ्यांचा विकास केला.. त्यानंतर अनेक क्षेत्रात उच्चतम पदभार सांभाळत जिल्हा परिषद सदस्य बांधकाम व आरोग्य विभाग तसेच आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदी विराजमान होऊन जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.. हे सर्व यश मला या प्रशालेतील संस्कार आणि शिक्षणामुळे मिळाले… म्हणूनच आज या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊन शिक्षण क्षेत्रातही कार्य करण्याची संधी मिळाली आहे.. आणि या संधीचा मी सोनं निश्चित करणार असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी गुरुजन एस डी चव्हाण, बी टी सुतार, श्री कृष्णा केसरकर, हे आवर्जून उपस्थित होते, हायस्कूलचे माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई,प्र.प्रा. प्राचार्य एस जी खोराटे, वर्गमित्र दत्तात्रय सावंत नाथा, हुसेन दरवाजकर, गणपतराव ऐवाळे, जवळ जवळ २७ वर्गमित्र, प्रशालेचे सध्याचे कलाशिक्षक श्रीकृष्ण दावणे, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राध्यापक श्री शिवाजी पारळे यांनी केले व आभार दरवाजकर यांनी मानले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली… पण शाळेचाआवा,र इमारत ,वर्ग, बेंच, क्रीडांगण यामधून आजही या वर्ग मित्रांचे मन आणि पाय रमले होते. जड अंतकरणाने निरोप घेताना पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासनही देण्यात आले कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाची सांगता झाली.