बांधकाम कामगाराच्या पेटी वाटपाच्या कार्यक्रमात. – येणाऱ्या जि.प, प.स निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे नेत्यांचे बांधकाम कामगारांना अवाहन.
( मडिलगेत बांधकाम कामगारांना पेटी वाटप कार्यक्रम संपन्न. )
आजरा. प्रतिनिधी.
महाविकासआघाडी सरकारची बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभाची योजना असताना. मडिलगे ता. आजरा येथील बांधकाम कामगारांना पेटी वाटप व या योजनेतुन मिळणारा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्राम विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून आपल्याला लाभ मिळाला आहे. यामुळे यापुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील सर्व बांधकाम कामगार व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहावे असे आवाहन बांधकाम कामगारांना पेटी वाटप कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे तालुक्याचे नेते वसंतराव धुरे म्हणाले ते मडिलगे तालुका आजरा येथील बांधकाम कामगारांच्या पेटी वाटप कार्यक्रमाप्रसंगी रविवार दि. २० रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच बापू निऊगरे यांनी केले. श्री. धुरे पुढे म्हणाले मडिलगे गावातील पंधरा वर्षांपूर्वी चा विकास व आजचा विकास यामध्ये आपण मुश्रीफ साहेबांची कार्यपद्धती पाहू शकता ना. हसन मुश्रीफ सारखे नेते आपल्या मतदारसंघाला लाभले ते या मतदारसंघाचे भाग्य समजावे लागेल यासाठी आपण अखंडपणे त्यांच्या पाठीशी राहू या असे शेवटी बोलताना श्री. धुरे म्हणाले. नुतन जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मला तालुक्यातील नेत्यांनी मदत केली व हिमालयासारखे साहेब पाठीशी राहिल्यामुळे पैशाची वर नोकरीची आमिषे देणाऱ्यांना पराभूत केले यापुढे आपण सर्वांनी तालुक्यातील सर्व संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे कारण यापूर्वी आपण आजरा कारखाना कोणाच्या ताब्यात दिला होता व त्यांनी च्या कारखान्याची काय परिस्थिती करून ठेवली आपल्या डोळ्यासमोर आहे यामुळे यापुढेही आपण राष्ट्रवादीच्या सोबत राहून तालुक्याचा विकास साधूया असे बोलताना श्री देसाई म्हणाले.
काशिनाथ तेली म्हणाले गावागावातील गट-तट बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी काम करावे, आपल्या सोबत मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊ या व सोबत गावचा विकास करूया असे श्री तेली बोलताना म्हणाले.
प्रास्ताविक करताना श्री निऊगरे गावाला विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत असताना काही लोक पाय ओढण्याचा प्रयत्न करतात माझ्या बाबतीत देखील असेच झाले आहे. शासनाच्या विविध योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असताना आमच्या गटाला पक्षातील काही प्रवृत्ती असे कृत्य करत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. गावच्या विकासासाठी कामाची यादी दिलेली आहे. यामध्ये व्यायाम शाळेचे काम पूर्ण होत आले आहे. तरी उर्वरीत कामे लवकर मंजूर करून मार्गी लावावी व सर्वच विकास कामे सरपंच यांना पाहण्यास वेळ कमी पडतो यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या प्रभागात मागणी केलेली कामे त्यांची मंजूर करण्यात यावीत. सध्या १२२ बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे उर्वरित बांधकाम कामगारांना देखील लवकरच लाभ दिला जाईल सोबत ई. श्रम. कार्डाची योजना देखील गावात राबवणार असल्याचे श्री उपसरपंच निऊगरे यांनी सांगितले या योजनेचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान इंडियन गॅस आजरा चे व्यवस्थापक श्री व सौ मानसिंग देसाई यांनी इंडियन गॅस बाबत महिलांना माहिती दिली.
या कार्यक्रमाला उपसभापती वर्षा कांबळे, युवक राष्ट्रवादीचे ता. अध्यक्ष अनिकेत कवळेकर, हसन मुश्रीफ फाऊंडेशनचे सचिव सुधीर सावंत , ग्रामपंचायत सदस्य रेखा निऊगरे, शासन घाटगे, माजी सरपंच पुष्पलता जाधव, सागर सुतार, सुनील सुतार, रमेश कातकर, प्रकाश कडगावकर, पांडुरंग कुरळे, तानाजी आयवाळे, सह बांधकाम कामगार उपस्थित होते. यावेळी १२२ बांधकाम कामगारांना पेटी वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.