आंबेओहळ धरणग्रस्तांचे आजचे आंदोलन शिवजयंतीमुळे तात्पुरते स्थगित.
आजरा. प्रतिनिधी.
शनिवार दि. १९ रोजी
शिवजयंती असल्याने आंबेओहळचे पाणी रोखण्याचे आजचे आंदोलन मंगळवारी होणार आहे.धरणग्रस्तांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा स्थगित केली मात्र त्याची सूचना धरणग्रस्तांना दिली नाही त्यामुळे धरणग्रस्तांचा वेळ आणि कोल्हापूरचा प्रवास वाया गेला. धरणग्रस्तांची कुचेष्टा झाल्याची भावना धरणग्रस्तांनमध्ये निर्माण झाली. 14 तारखेला झालेल्या बैठकीनंतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे एकही काम झाले नाही. कागदी घोडे नाचवणेचे काम मात्र चालू आहे. धरणग्रस्तांची हेलपाटे मारून त्यांचं खच्चीकरण केले जात आहे, त्यांची कुचेष्टा केली जात आहे हे खपवून घेतले जाणार नाही. याचे परिणाम वेगळे होत जातील त्यामुळे धरणग्रस्तांची कुचेष्टा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी थांबवावी असे आवाहन बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी केले आहे.बैठकीला कॉ. संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, शिवाजी येजरे, महादेव खाडे, बाबुराव नाईक , शशिकांत तोरस्कर, शंकर पोटे, सदू शिवणे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते धरण स्थावर जाण्यासाठी आरदाळ येथील भैरीदेव मंदिर येथे सदरची बैठक घेण्यात आली.