आजरा दाभेवाडीतील उर्वरित रत्याच्या कामाचा शुभारंभ.- जि. प. सदस्या सुनिता रेडेकर .( जेष्ट नागरिक नारायण मुरकुटे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न.)
आजरा. प्रतिनिधी.
आजरा दाभेवाडी येथील यापूर्वी केलेला व उर्वरित राहिलेल्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ रविवार दिनांक १३ रोजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुनिता रेडेकर यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी उद्योगपती श्री रमेशराव रेडेकर सह सरपंच मनोहर जगदाळे उप. सरपंच गीता देसाई ग्रामपंचायत सदस्य संतोष चौगुले, रघुनाथ गुरव तसेच ग्रामपंचायत च्या महिला सदस्य उपस्थित होत्या. दाभेवाडी गावचे संजय देसाई यांनी मनोगत व्यक्त केले आजरा बँकेचे संचालक श्री नारायण मुरकुटे, व रामचंद्र मुरकुटे यांचा आजरा समृद्धी प्रोड्यूसर समृद्धी कंपनीच्या संचालक पदी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा व सरपंचांचा सत्कार करण्यात आला जि. प. सदस्या सुनिता रेडेकर यांनी मतदार संघातील गावाना भरपूर निधी देऊन विकासकामे केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले यावेळी दाभेवाडी गावातील गावातील श्रीपतराव देसाई,गुरुजी, राजेंद्र देसाई, कोंडीबा वांगणेकर, सुधाकर देसाई, सर्जेराव देसाई, दत्ता देसाई, धीरज देसाई, शरद मगदूम, माजी उप सरपंच सुनीता देसाई, माया मुरूकटे, ताराबाई मुरकुटे, कॉन्ट्रॅक्टर अरुण केसरकर उपस्थित होते. देसाई गुरुजी यांनी आभार मानले.
