भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांची सावंतवाडीत ८ फेब्रुवारी सकाळी १० वाजता शोकसभेचे आयोजन.
सावंतवाडी :- प्रतिनिधी.
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सावंतवाडी येथे मंगळवार आठ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोकसभा सावंतवाडी नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आली असून तमाम संगीत प्रेमींनी या शोक सभेस उपस्थित रहावे असे आवाहन विधानसभा विशेष हक्क समिती प्रमुख व माजी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.