अखिल भारतीय जेष्ठ – वरिष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने राज्य परिवहन मंडळाला निवेदन. – एस. टी सेवा सुरळीत करा.
आजरा. प्रतिनिधी.
अखिल भारतीय जेष्ठ – वरिष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर विभाग यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की. एसटी बंदमुळे ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात पासून एसटी वाहतूक बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे. ते शब्दात सांगणे कठीण आहे. आमचे ज्येष्ठ नागरिक सदैव एसटी शिवाय प्रवास करीत नाहीत एसटीची सेवा सुरक्षित आणि विश्वास असल्याने आम्हा जेष्टाना तो मोठा आधार वाटतो. परंतु अलीकडे ज्येष्ठांना एसटी सेवा उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या ज्येष्ठांचे आरोग्याचे प्रश्न, पेन्शन प्रश्न या कामांसाठी वडाप खाजगी गाड्यांचा प्रवास करावा लागत आहे. जास्त नागरिकांना जिवंतपणी सेवा मिळाव्या हे शासनाचे धोरण असताना आरोग्य सेवा घेण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध नसल्याने घरीच प्रथम उपचार करण्याची वेळ येत आहे. तरी ही बाब ज्येष्ठ नागरिकांना परवडणारी नसून ही परखट थांबून एसटी एसटीची सेवा सुरळीत करावी व वाहक चालक आपल्या न्यायालयीन लढा चालू ठेवून कामावर हजर राहावे व शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना एसटीची सेवा देऊन सहकार्य करावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर ज्येष्ठ नागरिक चळवळ गडहिंग्लज संस्थापक मार्गदर्शक राजकुमार सावंत, नारायण मुरकुटे, आजरा ता. अध्यक्ष शंकर पारपोलकर, विठोबा राणे, राजाराम सरदेसाई, विजयराव पाटील, धनाजी देसाई, बंडोपंत कुंभीरकर, ज्योतिबा भोगन, महादेव होडके, श्री. गिलबिले, सह आजरा गडहिंग्लज, चंदगड येथील ज्येष्ठ नागरिकांच्या सह्या आहेत.