आजरा कारखान्याचे १६ फेब्रुवारीपासून येणाऱ्या ऊसाला ५० रु इन्सेंटीव्ह देण्याचे नियोजन. – चेअरमन सुनिल शिंत्रे.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याने ४.०० लाख में टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सदर उद्दिष्ट पूर्ततेसाठी कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्याकडे गाळपासाठी आणलेत नियोजन देखील केलेले आहे आज रोजी कार्यक्षेत्रात १६६ स्थानिक व बीड अशी तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रातून प्रतिदिनी २००० में टन ऊस गाळपासाठी येत आहे अद्याप ही कार्य क्षेत्रात ७० ते ८० हजार में टन सुशील असून तो गाळपासाठी येणार आहे. त्याचप्रमाणे कारखान्याकडे नोंद केलेला गेटकेन मधील ऊस देखील कारखान्याकडे येत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी कारखाना आर्थिक अडचणी अडचणीमुळे गेली दोन वर्ष बंद होता. त्यानंतर जिल्ह्याचे नेत्यांच्या सहकार्याने तसेच कार्यक्षेत्रातील व कार्य क्षेत्राबाहेरील सहकारी संस्थांच्या आर्थिक मदत करून सुरू केलेल्या आजरा साखर कारखान्यावर विश्वास ठेवून सुरुवातीपासून आपला ऊस गाळपासाठी पाठवला असून आजपर्यंत सतत पाठवीत आहेत आज देखील कारखान्याकडील सभासद शेतकऱ्यांना आपला ऊस आजरा कारखाना कडे गायक का करता पाठवा साठी ठेवला आहे. शेतकऱ्यांना कारखाना कडून दिलासा मिळावा यासाठी दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून पुढे येणाऱ्या उसाला प्रति टन रुपये पन्नास उशिरा अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन श्री सुनील शिंत्रे यांनी दिली कारखान्याने आजअखेर २८२७३० में टन ऊस गाळप केले असून अद्यापही कार्यक्षेत्रातून गाळपासाठी ऊस उपलब्ध होत आहे कारखाना १५ मार्च २०२२ पर्यंत गाळप सुरू ठेवणार असून सभासद शेतकऱ्यांनी आपल्या उसाची काळजी न करता आपला ऊस कारखाना साठी राखून ठेवावा सदर प्रमाणे संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी दिली त्याचबरोबर ऊस विलंबाने येणार असल्याने वजन घट म्हणून आपणास प्रतिटन ५० रू प्रमाणे, उशिरा अनुदान देण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकवलेला ऊस आपले साखर कारखाना देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्री. शिंत्रे यांनी केले आहे. या वेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक व कार्यकारी संचालक अधिकारी वर्ग उपस्थित होते.
